सावरगाव घाट (ता. पाटोदा) - संत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे गुरुवारी दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री पंकजा मुंडे. esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: मी कधीही कुणासमोर झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा एल्गार

सावरगाव घाट येथे तुफान गर्दीत दसरा मेळावा

सकाळ डिजिटल टीम

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा बीड येथे दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, असं प्रतिपादन केलं आहे.

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा दसरा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. स्व. मुंडे साहेबांच्या विरोधकांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली. परंतु मी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. ते माझ्या रक्तात नाही.

"माझ्याकडे तुमच्यासाठी द्यायला खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही. ती माझी ऐपत नाही. तुम्ही मला सांभाळून घेताय, ही मोठी गोष्ट आहे. संघर्षाशिवाय नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली."

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनाही संघर्ष कारावा लागला. ४० वर्षे त्यांनी संर्घष केला. तेच रक्त माझ्यात असल्यामुळे मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही.

"गर्दी माझी शक्ती आहे. हेच जे.पी. नड्डांनी मला सांगितलं. मी फक्त गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलजींचा, प्रमोदजींचा नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवते. मी शत्रुविषयी वाईट बोलत नाही तर माझ्याविषयी वाईट बोलणारांवर टीका कशी करेल''

बीडमधील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे बोलत आहेत.

मी २०२४ च्या तयारीला लागले आहे- पंकजा

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या की, १७ वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. सध्या मी २०२४च्या तयारीला लागले आहे. पक्षाने तिकीट दिलं तर त्यासाठी मी आत्तापासून तयारीला लागेल आहे. सभा घेण्यासाठी मी राज्यात फिरले पण मी खुर्चीसाठी राजकारण करत नाही. तुम्ही दसरा मेळाव्याला नाही अलात तर मी नाराज होईन. पण मी आत्ता नाराज नाही, त्यामुळे मीडियाने अशा बातम्या बंद कराव्यात, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT