Pankaja Munde not quitting BJP Says Chandrakant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Video : पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गेल्या 2 दिवसांपासून भाजपनेत्या पंकजा मुंडे या भाजपव्यतिरिक्त अन्य कोणता विचार करतील असा चर्चा सुरू आहे. परंतु, अशा कोणत्याही बातम्यांना अर्थ नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं झालं असून ज्या स्तरावरून त्या इथपर्यंत आल्या आहेत. त्यावरून त्या असा विचार करणार नाहीत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, 'राज्याचा भाजप अध्यक्ष म्हणून मी अधिकृतपणे आपल्यासमोर आलो आहे. 12 डिसेंबरला गोपिनाथ मुंडे यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो, दरवेळी आम्ही जातच असतो यावेळीही आम्ही जाणार आहोत'. पराभवानंतर  मोठे नेते आत्मपरीक्षण करत असतात ते प्रत्येकाने करायलाच हवं, पंकजाताई ही सध्या आत्मपरिक्षण करत असून त्यांची मानसिक स्थितीवरून त्या दुसरीकडे जाणार आहेत असे नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हीच ती वेळ; सोशल मिडीयावर पंकजा मुंडे समर्थकांची मोहीम 


 
पंकजाताईंना पक्षात त्या गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने त्यांना यश काही सहज मिळालेले नाही. त्यांनी ते संघर्ष करून मिळवले आहे. वडिल गोपिनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतरही त्या तुटल्या नाहीत त्यांनी जबाबदारी घेत बहिणीला लोकसभेच्या निवडणुकीत जिंकवलं. पंकजा दुसऱ्या पक्षात जाणार ही कल्पना अपघाताने जे सरकार आलाय त्यांच्या डोक्यातून आलेली असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते सरकार किती दिवस टिकणार हेही माहीत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 6 सप्टेंबर 2025

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT