Pankaja Munde statment on Piyush Goyal and Anil Bonde declared candidates for Rajya Sabha from BJP  
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

आज भाजपकडून देशभरातील राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र त्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Pankaja Munde statment on Piyush Goyal and Anil Bonde declared candidates for Rajya Sabha from BJP)

पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर करण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नाहीये, पण ज्यांना उमेदवारी मिळाली त्याचा मला आनंद आहे. कारण अपेक्षितच होतं, पियूष गोयल यांना उमेदवारी मिळणं. तसेच विदर्भाला संधी मिळाली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या अनिल बोंडे यांना संधी मिळाली त्यांना शुभेच्छा, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. तसेच त्यांना विधानपरिषदेसाठी इच्छा आहे का? असे विचारले असता, विधान परिषदेबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातून भाजप तिसरा उमेदवार देणार का या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यात आहे. अजून तीसरा उमेदवार दिला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांना दुसरी संधी न देता विदर्भातील चेहरा अनिल बोंडे यांना यावेळी संधी देण्यात आली. पियूष गोयल यांचे नाव देखील चर्चेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT