Devendra Fadnavis, Pankaja Munde 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस माझे भाऊ नाहीत, भाऊ म्हटले की आता... : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उद्धव ठाकरे आणि महादेव जानकर हे मुंडेसाहेब हयात असतानाचे भाऊ आहेत. त्यानंतरच्या काळात कुणाला 'भाऊ' मानलेले नाही. कारण 'भाऊ' म्हटले की मला भीती वाटते, असे वक्तव्य माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीसांचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगण्यात आले होते. त्यावर फडणवीसांचा 'मित्र' असा उल्लेख पंकजा यांनी केला. त्याला जोडून पंकजा म्हणाल्या, आता कुणाला भाऊ, बहिण म्हणू वाटत नाही. कारण 'भाऊ' म्हटले की मला भीती वाटते. उद्धव ठाकरे, महादेव जानकर यांना मुंडेसाहेब हयात असतानाच 'भाऊ' मानल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

गोपीनाथ गडावरील गाजलेल्या कार्यक्रमानंतर एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना कोअर कमिटीत घेतले, मंत्री केले, अशा आशयाचे विधान केले होते. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कोअर कमिटीमध्ये माझ्याबरोबर इतरांनाही समाविष्ट केले होते. मी आधी आमदार म्हणून काम केलेले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी राज्यभर पक्षासाठी संघर्ष यात्रा काढली होती. मी तेव्हा राज्यात पक्षासाठी 350 सभा घेतल्या होत्या. त्यामुळे कोणी मला काही दिले हे म्हणूच नये. अमिताभ बच्चन यांच्या मुलाने कितीही चांगले काम केले तरी लोक म्हणणार की वडिलांच्यामुळेच त्यांना काम मिळाले आहे. राजकीय नेत्यांच्या मुलांबाबतही असे बोलले जाते. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर मी आमदार म्हणून निवडून आले तेव्हाच मी मला सिद्ध केले आहे. पण आता मी असे ठरवले आहे की वारंवार माझे कर्तृत्व काय आहे? हे विचारणाऱ्यांना मी पुन्हा शुन्यापासून सुरवात करून माझे कर्तृत्व दाखवून देईन. 

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आदींची तिकिटे कापली गेली त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी कोअर कमिटीत होते परंतु मी ते थांबवू शकले नाही, याचे मला वाईट वाटते. एकनाथ खडसे सारख्या माणसाचे राजकीय अस्तित्व पणाला लागलेले असताना त्यांच्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. संघटनेला कठीण निर्णय घ्यावे लागतात. निर्दय व्हावे लागते. पण घेतलेल्या निर्णयाचे परिणाम असतात. बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. त्याचा फटका पक्षाला विदर्भात बसला. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही बसला. वंजारा समाजातही भाजपने फक्त मला एकटीला तिकीट दिले पण राष्ट्रवादी काँग्रेसने सात जागा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT