Photos of Rahul Gandhi and Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : "नीयत हो नेक और इरादे हों साफ..." ; राहुल गांधी आणि संजय राऊतांचा फोटो चर्चेत!

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत आज जम्मू-काश्मीरमधील कठुआमधून जाणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सामील झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कठुआ जिल्ह्यातील हातली मोर येथून पक्षाची 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली. या यात्रेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान काँग्रेसच्या अधीकृत ट्वीटरवर संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून भाजप नेते या फोटोवर टीका करत आहेत.

"जर नियत चांगली असेल आणि हेतू स्पष्ट असेल तर ... चेहऱ्यावर हास्य तरळते", असे कॅप्शन काँग्रेसने राहुल संजय राऊत यांच्या फोटोला दिले आहे. फोटोमध्ये संजय राऊत हसताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची गळाभेट देखील घेतली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “मी माझ्या पक्षाच्या वतीने यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहे. देशातील वातावरण झपाट्याने बदलत आहे आणि मी राहुल यांना खऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवणारा नेता म्हणून पाहतो. ज्या प्रकारे लोक या यात्रेत सामील होत आहेत, ते हृदयस्पर्शी आहे."

दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. हिंदुत्वासाठी राम जन्मभूमीचा लढा जेव्हा लाखो कारसेवक लढत होते, तेव्हा संजय राऊत प्रभादेवीच्या गल्लीत बसून होते. ३७० कलम मुक्त काश्मीर व्हावे यासाठी असंख्य जण संघर्ष करीत होते, बलिदान देत होते, तेव्हा संजय राऊत मुंबईत बसून मीडियात ध्वनी प्रदूषण करीत होते, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

शेलार म्हणाले, "देव, देश आणि धर्माच्या संघर्षातून गायब असलेले संजय राऊत काँग्रेसच्या युवराजांसोबत चालायला गेले. याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार गेले. पक्षाची शकले उडाली."

संजय राऊत यांच्या या फोटोमुळे शिवसेनेच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सावरकरांचा अपमान करणारे राहुल गांधी यांच्याबरोबर संजय राऊत चालत असल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका होत आहे. शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी राऊत हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाविरोधात काम करत असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT