PM Modi Mann Ki Baat Praised Bhandarkar Oriental Institute Pune ANI
महाराष्ट्र बातम्या

जेम्स लेन प्रकरणावरून हल्ला झालेल्या भांडारकर संस्थेचं मोदींकडून कौतुक

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर (Bhandarkar Oriental Institue Pune) २००४ साली हल्ला झाला होता. अमेरिकन लेखक जेम्स लेनला (American Writer James Laine Case) छत्रपती शिवाजी महाराजांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) पुस्तक लिहिण्यास मदत केल्याचा आरोप या संस्थेवर ठेवण्यात आला होता. आज पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात (PM Modi Mann Ki Baat) मधून याच संस्थेचं कौतुक केलं आहे. या संस्थेतून विदेशातील लोकांना महाभारत समजविण्यासाठी एक कोर्स सुरू करण्यात आला आहे, असं मोदी म्हणाले.

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्था चांगलं काम करत आहे. त्यांनी महाभारत विदेशातील लोकांना समजावं यासाठी एक कोर्स सुरू केला आहे. यामध्ये चार हजार वर्षांपूर्वीचा इतिहास त्यांनी सांगितला आहे. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा हा कोर्स आहे, असं मोदी आज मन की बातमधून म्हणाले.

नेमका का झाला होता हल्ला? -

जेम्स लेन हा मूळचा अमेरिकन प्राध्यापक आणि लेखक आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्र्यावर ‘शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे एक पुस्तक लिहिले. हे पुस्तकासाठी अभ्यास करण्यासाठी जेम्स लेन पुण्यात आला होता त्यावेळी त्याने भांडारकर प्राच्च संशोधन संस्थेत संशोधन केल्यांचा आरोप आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला होता. यातूनच संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ला केला होता. याचे राजकीय पडसाद देखील उमटले होते. याप्रकरणी पोलिसांनी ७२ आरोपींना अटक केली होती. पण, न्यायालयाने चार वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची निर्दोष सुटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT