महाराष्ट्र बातम्या

PM मोदींकडून शरद पवारांचं कौतुक; पण राष्ट्रवादीचे मोदींना गंभीर प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा संसदेत बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं होतं. कोणाकडून नाही तर किमान शरद पवार यांच्याकडून तरी शिका असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या खासदारांना लगावला होता. शरद पवारांचं कौतुक मोदींनी केलं असलं तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. मोदीजी 'पीएम केअर फंड' गेला कुठे? असा सवाल करत राष्ट्रवादीने मोदींना प्रश्नांच्या कचाट्यात घेरलं आहे. (PM Modi praises Sharad Pawar in Rajya Sabh)

पीएम केअर फंड पहिल्यापासूनच संशयाच्या भोवऱ्यात वेढला गेला होता. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोदींना प्रश्नाच्या जाळ्यात ओढलं आहे. याआधी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना रेल्वे तिकीट वाटून यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरवण्यासाठी हातभार लावल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. खासकरुन महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदींच्या विधानाविरोधात मोठी राळ उठली. यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना काही गंभीर प्रश्न केले आहेत.

पक्षाने ट्विट करत म्हटलंय की, कोरोनाचा उद्रेक सुरु झाल्यानंतर मोठा गाजावाजा करत पंतप्रधानांनी ‘पीएम केअर फंड’ सुरु केला. कोविडसारखे आकस्मिक संकट कोसळल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा फंड खर्च करण्यात येईल, असे हा फंड सुरु करताना सांगण्यात आले. पीएम इंडिया या वेबसाईटवर देखील हाच उद्देश अजूनही लिहिलेला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही गंभीर प्रश्न विचारण्याची गरज आहे.

पुढे म्हटलंय की, पीएम केअर फंडमध्ये २०२०-२१ या वर्षात १०,९९० कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९७६ कोटी इतकीच रक्कम वितरीत झाल्याचे ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे. १,३११ कोटी हे व्हेंटिलेटर्स बनविण्यासाठी खर्च करण्यात आले. मात्र हे व्हेंटिलेटर्स निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः औरंगाबाद येथील रुग्णालयात या निकृष्ट व्हेंटिलेटरचा पर्दाफाश केला होता. याशिवाय सुमारे २०० कोटी कोविड हॉस्पिटल्स, बेड, ऑक्सीजन प्लाण्ट आदींसाठी खर्च केले गेले. तसेच एक हजार कोटी हे स्थलांतरीत मजुरांच्या सोयी सुविधांसाठी खर्च करण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभेत बोलत असताना कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि स्थलांतरीत कामगारांना दोषी ठरवले होते. मात्र याच मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक ट्रेनची सुविधा दिली होती. त्यासाठी एक हजार कोटी खर्च करण्यात आले असल्याचे केंद्राकडूनच सांगितले जात असेल तर मोदीजी महाराष्ट्राला कसे जबाबदार धरू शकतात? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

ही दुटप्पी भूमिका कशासाठी याचे उत्तर मोदींनी देणे गरजेचे आहे, तसेच पीएम केअर फंडमधील बाकी रकमेचे काय झाले याचे उत्तरही त्यांच्याकडून अपेक्षित आहे, असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident: मोठी बातमी! मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात; रेल्वे दोन भागात विभागली अन्...; काय घडलं?

मुंबई संघ सोडण्यास निघालेला Yashasvi Jaiswal परतला! द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी या संघाविरुद्ध खेळणार

जीव माझा गुंतला फेम योगिता-सौरभमध्ये बिनसलं ? सोशल मीडियावर केलंय अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट

Hair Regrowth Serum: एका सिरममुळे अवघ्या 20 दिवसांत परत येणार केस ; शास्त्रज्ञांचा दावा!

Matheran Mini Train: पावसामुळे परंपरेला ब्रेक! 'माथेरानची राणी' नोव्हेंबरपासून धावणार

SCROLL FOR NEXT