PM Modi Pune Visit esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Pune Visit : ...अन् अजित पवार गालात हसले" पवारांची शाबासकी मिळाल्यानंतर मोदींची अजित पवारांना थाप

संतोष कानडे

Narendra Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदींना लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर दाखल झाल्यानंतर शरद पवारांनी त्यांची पाठ थोटपली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर माघारी परतत असतांना मोदींनी अजित पवारांना थाप दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात सन्मानित करण्यात आलं. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आदी उपस्थित होते.

शरद पवारांनी दिली थाप

पुरस्कार सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहात मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते. दीपक टिळक यांच्या बाजूला शरद पवारांची आसनव्यवस्था होती. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलले होते.

मोदींनी दिली अजित पवारांना थाप

कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी उपस्थितांना अभिवादन करत होते. जेव्हा ते अजित पवारांच्या जवळ पोहोचतले तेव्हा माध्यमांचे कॅमेरे झूम-इन झाले. मोदींनी अजित पवारांच्या दंडावर थाप दिली. अजित पवारांच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी लपून राहिले नव्हते. गालातल्या गालत हसत त्यांनी मोदींना नमस्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्‍वविजेतेपदाची ‘गंगा’ आली अंगणी; सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

अभिनेते धर्मेंद्र यांना आवडायची सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी; चित्रकाराने काढली १०० हून अधिक चित्रे, जुन्या आठवणी जागवल्या !

Maoist Movement : माओवादी चळवळीच्या शेवटच्या घटका? शरणागतीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र, मागितला 'इतका' दिवसांचा वेळ

Olympic Games: 'कर्णबधिरांच्या ऑलिंपिकमध्ये सातारच्या प्रांजली धुमाळला सुवर्णपदक'; टोकियो येथे २५ वी ऑलिंपिक स्पर्धा, जागतिक विक्रम मोडला !

Ayodhya Ram Temple : पंतप्रधान मोदी आज अयोध्येतील राम मंदिरावर ध्वज फडकवणार, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह दिग्गज उपस्थित राहणार

SCROLL FOR NEXT