PM Narendra Modi Rally At Akola for Vidhansabha elections
PM Narendra Modi Rally At Akola for Vidhansabha elections 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : मोदी विरोधकांना म्हणाले, 'डुब मरो, डुब मरो...'

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मोदींनी 'महायुतीचे मजबूत सरकार पुन्हा एकदा येण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी आज आलोय. आता यापेक्षाही मजबूत सरकार बनवणार आहोत. पुढच्या पाच वर्षांत सगळ्या देशाला महाराष्ट्राची ताकद दाखवू, यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत,' असे सांगत अकोलाकरांना 'कसे आहात अकोलाकर' असा प्रश्न विचारला. आज (ता. 16) विदर्भातील अकोल्यात भाजप उमेदवारांसाठी त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी मोदींनी विरोधकांवर कडाडून टीका केली. भाजप सरकार येण्यापूर्वी जे सरकार होते, त्यांच्यासमोर कोणतेही ध्येय नव्हते. त्यांचे ध्येय हे केवळ आपले व आपल्या कुटूंबाचे कल्याण कसे होईल याकडे बघत होते. त्यांच्याकडे विकासाच्या कोणत्याही योजना नव्हत्या, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवीन दिशा मिळाली. फडणवीस सरकारसमोर फक्त 'महाराष्ट्राचा विकास' एवढेच ध्येय होते, त्याप्रमाणे त्यांनी राज्यात विकास घडवला, असे मोदींनी सांगितले. 

मोदींनी 370 कलम रद्द करून बरोबर केलं का?
तसेच महाराष्ट्रात प्रचार करणारे भाजप नेते काश्मीरच्या कलम 370 वरून का बोलतात, असे सवाल विरोधकांकडून केले जात आहेत. याला उत्तर देत मोदींनी सांगितले की, काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील जवान मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील काही जवानांनी देशासाठी बलिदान दिलंय. असे असूनही विरोधकांनी कलम 370 रद्द करण्यास विरोध केला. या सगळ्यात विरोधकांनी जवानांकडेही दुर्लक्ष केलंय, असा आरोप मोदींनी केला. तर मोदींनी 370 कलम रद्द करून बरोबर केलं का, 370 हटविल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का असे सवाल मोदींनी यावेळी अकोलाकरांना विचारला. 'तुमचा आशीर्वाद असेल तर मोदी नवीन नवीन गोष्टी करत राहील' असेही त्यांनी यावेळी सांगितले. डुब मरो, डुब मरो म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

विरोधकांना मतभेद असलेला देश हवा आहे...
महाराष्ट्रातील जनतेचा आनंद बघून विरोधकांचा चेहरा उतरला आहे, तेज गेलंय. विरोधकांना देशात भांडणं, मतभेद हवे आहेत. राजनैतिक स्वार्थासाठी विरोधक कोणत्याही थराला जात आहेत, असा आरोप मोदींनी यावेळी केला. 

महाराष्ट्रात विकास 
महाराष्ट्रात दुष्काळ कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जलयुक्तशिवार शेताशेतात तुम्हाला दिसू लागले आहेत. भाजप सरकार आल्यापासून जातीय दंगे आणि बॉम्बस्फोट थांबल आहेत. असे सांगत मोदींनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. यावेळी मोदींनी अकोल्याचे ग्रामदैवत राजराजेश्वराचे नाव घेऊन सभेला सुरवात केली. तसेच सर्व महापुरूषांची नावे घेत अभिवादन केले. काँग्रेसने बाबासाहेबांचे संविधान काश्मीरमध्ये लागू न करण्याचा निर्णय घेतला व बाबासाहेबांचा अपमान केला आहे, अशी टीका मोदींनी केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 9 सभा होतील. त्यापैकी एक सभा यवतमाळला झाली. तर आज तीन सभा होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT