pm narendra tweet about sant tukaram maharaj day before dehu pune mumbai visit
pm narendra tweet about sant tukaram maharaj day before dehu pune mumbai visit  
महाराष्ट्र

संत तुकारामांनी आपल्या शिकवणीतून समाजाला दिशा दिली - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत, या भेटी दरम्यान ते उद्या देहूतील संत तुकाराम मंदिराच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज ट्वीट करत त्यांच्या दौऱ्याचा तपशील सांगितला आहे. संत तुकाराम यांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. (pm narendra tweet about sant tukaram maharaj day before dehu pune mumbai visit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की , मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहे, तसेच महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनींच्या भेटीची वाट पाहत आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, देहू येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याने मी धन्यता मानतो. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत पहिला कार्यक्रम राजभवनात होणार आहे. मी जलभूषण इमारत आणि क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन करेन. ही गॅलरी 2016 मध्ये सापडलेल्या बंकरशी संबंधित असून ब्रिटीश राजवटीत, ती शस्त्रे आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरली जात होती. तर संध्याकाळी, मी मुंबईतील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांपैकी एक असलेल्या मुंबई समाचार च्या द्विशताब्दी महोत्सवात भाग घेईन. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मी मुंबई समाचारच्या संपूर्ण टीमचे आणि त्यांच्या वाचकांचे अभिनंदन करू इच्छितो, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 14 जून रोजी देहू येथे येत आहेत. येथे त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात ही सभा होईल.

या कार्यक्रमाची महिनाभरापासून तयारी सुरु आहे. संवाद सभेसाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक येणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पावलोपावली खडा पहारा दिसून येत आहे. परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट केली जाणार आहे. मुख्य मंदिरात आगमन होताना चारशे वारकरी त्यांचे स्वागत करणार आहेत. येथे उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र दौऱ्याची लगबग असून देहूवासियांमध्येही उत्साह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT