महाराष्ट्र बातम्या

२६/११च्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या प्रताप दिघावकरांचा भाजप प्रवेश!

Police Officer joins BJP:माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रताप दिघावकर काही दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Pratap Dighavkar joins BJP:माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रताप दिघावकर काही दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास प्रताप दिघावकर यांनी केला होता. त्यामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली.

प्रताप दिघावकर यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. प्रदीव दिघावकर म्हणाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामुळे प्रभावित झाले आहेत.

यापुढे ते म्हणाले की, "सांगायला अभिमान वाटतो, जगातील प्रत्येक ठिकाणी भारताचा तिरंगा ताठ मानेने फडकतोय.रक्ताचा थेंब असेपर्यंत भाजपात काम करत राहील. मी पुण्यातील एसपी असताना मोदी साहेबांनी मला ऑटो आणि आयटी क्षेत्र का वाढलं हे विचारलं. सामान्य एसपींना तत्कालीन मुख्यमंत्री मोदी विचारतात हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. छोट्या लोकांना देखील ते विचारतात आणि त्यांच्याकडून समजावून घेतात."

यापुढे ते म्हणाले की,"खान्देशासाठी आमच्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. त्यामुळे नारपार प्रकल्प आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रिइल कोरीडोर प्रकल्प आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ,राजकारणात कुठे पिन मारायची आणि कुठे पंप मारायचा याची मी आजपासूनच सगळ्या सरपंचाकडून शिकवणी घेतो."

प्रताप दिघावकर यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पोलीस दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्यपदही भुषवले होते. त्यांनी अनेक अवघड वाटत असलेल्या प्रकरणांचा छडा लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT