Sandip Patil
Sandip Patil 
महाराष्ट्र

राज्यभरात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सकाळवृत्तसेवा

सातारा : उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे आता सातारचे पोलिस अधीक्षक झाले आहेत. येथील अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील 95 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात यांचा समावेश आहे. अधीक्षक पाटील यांनी गेल्या दोन वर्षात साताऱ्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जोरदार कामगिरी केली. मोक्का कायद्यानुसार कारवाई करत त्यांनी जिल्ह्यातील खासगी सावकारांचे कंबरडे मोडले. तडीपारीच्या शंभरहून अधिक कारवाया करून टोळीने गुन्हे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. साताऱ्यातील बरेच नामचीन त्यामुळे कारागृहाची हवा खात आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चांगलीच दहशत निर्माण झाली. सातारकरांच्या कायम स्मरणात राहील अशी कारकीर्द त्यांनी केली.

पंकज देशमुख हे 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नांदेड येथे सहायक अधीक्षक तर नगर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

परभणीच्या पोलीस अधिक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय
परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. परभणीचे सध्याचे पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांची अमरावती ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. राज्यातील पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (ता.२७) काढण्यात आले. यात ९५ अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परभणीचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची अमरावती ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय हे परभणीचे नवे पोलिस अधीक्षक असतील.

ठाण्याचे सुनील प्रभाकर भारद्वाज अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य
अकोला : राज्यात पोलिस दलातील अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढण्यात आले. यात अकाेला येथील अप्पर पोलिस अधीक्षक आणि बुलडाणा येथील पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांचीही बदली करण्यात आली आहे. बुलडाणा येथील पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोंदिया येथील पोलिस अधीक्षक डी. के पाटील भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला अप्पर पोलिस अधीक्षक विजयंकात सागर यांची  वसई पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांची  जागा नंदूरबारचे प्रशांत वाघुडे घेतील. अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. जे. शेखर यांची मुंबई येथे पदोन्नतीवर पोलिस उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाण्याचे सुनील प्रभाकर भारद्वाज अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे नवीन प्राचार्य म्हणून रुजू होणार आहेत. अनेक दिवसांपासून राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत चर्चा होती. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा बदली आदेश काढण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT