पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?

राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. त्यातही पहिल्यांदा लेखी की मैदानी परीक्षा होईल, याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे भरतीची तयारी करणारे उमेदवार संभ्रमात आहेत.

राज्य सरकारने मागील पाच-सहा वर्षांत शासकीय रिक्त पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे सध्या शासनाच्या विविध विभागांमधील रिक्तपदांची संख्या पावणेतीन लाखांवर पोहचली आहे. कमी मनुष्यबळावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्याची स्थिती गृह विभागासह सर्वच विभागांमध्ये पहायला मिळत आहे. एकाच अधिकारी किंवा हवालदाराकडे अनेक गुन्ह्यांचा तपास असल्याने पेन्डन्सी वाढल्याचीही वस्तुस्थिती आहे. सोलापूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये रिक्तपदांची संख्या मोठी आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण विशेषत: महिलांच्या बाबतीतील गुन्हे वाढले आहेत. २०१९ मध्ये जाहीर केलेली भरती दीड वर्षांत पूर्ण झाली आणि आता २०२० मध्ये घोषित झालेली भरती कागदावरून प्रत्यक्षात उतरलेली नाही. राज्यातील तीन ते पाच लाख तरूण-तरूणींना भरतीची प्रतीक्षा लागली आहे. गृहमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या. पण, अजूनही त्यासंदर्भात काहीच कार्यवाही सुरु झालेली नाही, हे विशेष. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मधील सात हजार २३१ पदांसाठी अर्ज मागविले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरवातीला लेखी की मैदानी?
लेखी परीक्षा सुरवातीला घेतल्यास ग्रामीण भागातील उमेदवारांना फटका बसू शकतो. तर पहिल्यांदा मैदानी परीक्षा झाल्यास शहरातील उमेदवार स्पर्धेतून बाहेर जातील, असा पेच गृह विभागासमोर आहे. आतापर्यंत दोनवेळा त्यात बदल झाला असून काहीवेळा पहिल्यांदा मैदानी तर काहीवेळा लेखी परीक्षा घेतली गेली. पण, ग्रामीण विद्यार्थ्यांची मेहनत पाहता सुरवातीला मैदानी परीक्षाच घ्यावी, अशी मागणी काही आमदारांनी गृहमंत्र्यांकडे कली आहे. त्यावर अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.

विभागनिहाय टप्प्याटप्याने भरती होईल
राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय विभागातील विशेषत: गृह व आरोग्य विभागांमधील सर्व रिक्तपदे भरण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही केली जात आहे. जूनअखेरीस त्याची भरती प्रक्रिया सुरु होईल.
- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT