झेडपी शाळा sakal
महाराष्ट्र बातम्या

झेडपी शाळांची दुरावस्था! २८ हजार विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे फक्त २७ शिक्षक

सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता खालावल्याने पटसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. खासगी शाळांशी स्पर्धा करताना पटसंख्या टिकविण्याचे आव्हान असतानाही जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील सहावी ते आठवीतील जवळपास २८ हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ २५ ते २७ विज्ञानाचे शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता खालावल्याने पटसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. खासगी शाळांशी स्पर्धा करताना पटसंख्या टिकविण्याचे आव्हान असतानाही जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील सहावी ते आठवीतील जवळपास २८ हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ २५ ते २७ विज्ञानाचे शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मागील काही वर्षांपासून अशीच आवस्था असतानाही वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन निर्णय घेतला नाही हे विशेष.

गावोगावी खासगी शाळा वाढत असतानाच अनेक खासगी अनुदानित शाळांमध्येही पाचवीपासूनचे वर्ग सुरू झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत झेडपी शाळांमधील पटसंख्या टिकविण्याचे प्रमुख आव्हान शिक्षकांसमोर आहे. पण, काही मोजक्या शाळा वगळता अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. मागील तीन वर्षांत ४३ शाळांमधील पटसंख्या घटली असून त्या ठिकाणी दहापेक्षाही कमी विद्यार्थी आहेत. तर २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांची संख्याही २८ आहे. गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न होऊन शिष्यवृत्ती परीक्षा असो वा अन्य कोणत्याही परीक्षांसह अन्य उपक्रमांमध्ये विद्यार्थी नावलौकिक मिळवेल, अशा प्रयत्नांची गरज आहे. नुसते वर्गात बसून शाळा सुटेपर्यंत बसायचे आणि विद्यार्थ्यांना गणित सोडवायला किंवा पाढे म्हणायला लावायचे अथवा पाठ्यपुस्तकात काहीतरी सोडवायला सांगायचे असे प्रकार पूर्णपणे बंद व्हायला हवेत, अशी पालकांची मागणी आहे. मुलांना आता कृतियुक्त शिक्षणाची गरज असून, इतर उपक्रमांनाही प्राधान्य दिल्यास पटसंख्या वाढीस मदत होऊ शकते. मात्र, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या मुलांना शिकवायला विज्ञानाचे स्वतंत्र शिक्षकही नाहीत. त्यामुळे पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील उपशिक्षकांवरच त्या विषयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञानाचे जवळपास ५०० शिक्षक मंजूर आहेत, पण सध्या २७ शिक्षक स्वतंत्रपणे विज्ञान शिकवितात, अशी दुरवस्था आहे.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विज्ञान विषयाचे स्वतंत्र शिक्षक नाहीत. आता आम्ही समाजशास्त्र व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची माहिती संकलित केली आहे. त्यातून १२ विज्ञान झालेल्या शिक्षकांकडून समाजशास्त्राचा नकार घेऊन त्यांना विज्ञान विषयाची जबाबदारी दिली जाईल. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्यांपूर्वी हा विषय सोडविला जाणार आहे.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

झेडपी शाळांची स्थिती...
एकूण शाळा
२,७९८
शाळांमधील विद्यार्थी
२,०१,७९२
सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी
२८,६००
विज्ञानाचे मंजूर शिक्षक
५०३
कार्यरत शिक्षक
२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT