nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार? काँग्रेसचा बडा नेता महाराष्ट्र दौऱ्यावर

जगताप यांच्यापाठोपाठ पटोले यांची उचलबांगडी? चर्चांना उधाण

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी पाटील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चाचपणी करणार आहेत.

दरम्यान विदर्भातील नेत्यानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर नुकतीच भाई जगताप यांची उचलबांगडी करून मुंबई अध्यक्षपदाची माळ आता वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली आहे. तर आता लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

गेल्या काही महिन्यापासुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसुन येत होती. नाना पटोले यांच्या कार्यशैलीवरून अनेक नेत्यांनी तक्रार केली होती. पहिल्यांदा बाळासाहेब थोरात त्यानंतर विदर्भातील काही नेते यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर गेल्या निवडणुकीवेळी काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये हायकंमाड, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील अनेक नेते भेटले होते.

याच पार्श्वभुमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवस ते मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. त्याच्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे या चर्चेला आता बळ मिळालं आहे. यामुळे राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतचे वृत्त 'साम' या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Strait of Hormuz Toll : इराण भारताच्या जहाजांकडूनही वसूल करणार २० लाख डॉलरचा टोल टॅक्स? सरकारने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

Phaltan News: नीरा कालव्‍यात बहीण-भावाचा मृतदेह; फलटणमधून मंगळवारी झाले होते बेपत्ता, दाेघांबाबत नेमकं काय घडलं!

Parbhani News: खतांचा साठा कागदोपत्री; शेतकरी हवालदिल; ‘सकाळ’च्या स्टिंगमध्ये खत टंचाईचे वास्तव उघड

Satara Politics: कामेश कांबळे, लता कर्णे, ऋतुजा जगताप यांना अपात्र करा; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका, निकालाकडे लक्ष!

Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदार गैरहजर, कारभार वाऱ्यावर; डिजिटल स्वाक्षरी बंद झाल्याने प्रमाणपत्रांचे काम ठप्प, सिल्लोडकर त्रस्त

SCROLL FOR NEXT