Prakash Ambedkar News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: एकीकडे ठाकरेंसोबत युती तर... CM शिंदे-आंबेडकर यांच्यात बंद दाराआड चर्चा

शरद पवारांकडूनही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी हिरवा कंदील

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा झाल्या. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याबाबत ते उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही सर्वजण मिळून आगामी निवडणुका लढू असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

दरम्यान काल रात्री वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याच्यामद्धे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड अडीच तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसाठी चर्चा करत असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशातच मुख्यमंत्र्यांसोबतची ही बंददाराआड झालेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड अडीच तास झालेली चर्चा कशाबद्दल झाली आहे.

तर आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत दिसणार की नाहीत याची उत्तरे या बैठकीत लपलेली असू शकतात. तब्बल अडीच तास झालेल्या या बैठकीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या बैठकींचे सत्र सुरू झाल्यामुळे पुन्हा हे नेमके कोणते संकेत आहेत हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्याचं संगत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेटी वाढल्या आहेत. यामुळे इकडे देखील चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यात आहे.

शिंदे यांच्याकडूनही प्रकाश आंबेडकर यांनाही ऑफर देण्यात आली होती. काही अटीशर्ती यांच्याबद्दल ही बैठक झाली आहे का? एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांना आपल्याकडे वळवून घेणार का? या सर्व प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे तर अद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT