Prakash Ambedkar on Balasaheb Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : "बाळासाहेबांचे मताचे राजकारण..." ; प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar : बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा एकत्र होता. उद्धव ठाकरे यांनी माझ्या आजोबांचे हिंदूत्व मी घोतोय, असे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारणेची चळवळ सुरु झाली. बाळासाहेबांचे मताचे राजकारण होते, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. (Prakash Ambedkar on Balasaheb Thackeray)

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची चर्चा रंगली आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत. यावर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. मी त्यांना परवानगी देखील मागीतली आहे. शिवाजी पार्कवर ५ लाख लोकांसमोर त्यांचा सत्कार करेल. कारण ते खरे बोलले कोणी कोणी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मात्र त्यांनी एक मीस केलं की त्यानंतर उभ्या केलेल्या संस्था ह्या खोक्याच्या स्वरूपातून उभ्या केल्या. हे त्यांनी सांगितले नाही."

यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही. शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही विचार करु. असे सूचक वक्तव्य आंबेडकर त्यांनी केले होते.

एकत्र लढण्याबाबत ठाकरेंनी जाहीर कराव अशी मागणी केली आहे. आमची युती चार भिंतींच्या आत ठरली. मात्र त्याची घोषणा झालेली नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. ३५ वर्ष आम्ही राजकारणात आहोत. भाजपसोबत गेलो असतो तर कॅांग्रेस राष्ट्रवादीने आमचा खिमा केला असता. काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे गटाला फसवणार. दोघांना मी चांगला ओळखतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाश विज्ञान तुमच्या दारी! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO कडून सुवर्णसंधी; ‘युविका 2026’ साठी प्रक्रिया सुरू, कुठे अन कसा अर्ज कराल? वाचा सविस्तर

Farmer Success Story: वाट्याने शेत घेऊन अडीच एकरांत १२ लाखांचे खरबुजाचे उत्पादन; वांगीतील चौधरी भावंडांनी घेतले ५० टन फळ; व्यवस्थापनातून अडचणींवर मात!

IND vs SA : 'गौतम, सूर्या यांच्या दोन चुकांमुळे भारतीय संघ हरला'; द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर R Ashwin चांगलाच संतापला

Shaktipeeth Highway: शक्तिपीठसाठी जबरदस्तीने मोजणीचे राज्यभर पडसाद; परभणीतील महिला शेतकऱ्यांना मारहाण, बाधित शेतकरी संतप्त!

'तुझं नशीबच खूप चांगलं आहे गं' म्हणणाऱ्या बायकांना तेजश्री प्रधानने सुनावलं; म्हणाली, 'मी रात्रभर रडले...'

SCROLL FOR NEXT