Prakash Ambedkar statement on Lata Mangeshkar Memorial on shivaji Park 
महाराष्ट्र बातम्या

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये: प्रकाश आंबेडकर

शिवाजी पार्कवर खेळच खेळले जावेत. स्मारकासाठी इतरही अनेक जागा आहेत,असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं, अशी मागणी भाजपने (BJP) केली होती. लतादीदींच्या स्मारकाबाबत आपले मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 'शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये', असं वक्तव्य केलं आहे. शिवाजी पार्कवर खेळच खेळले जावेत. स्मारकासाठी इतरही अनेक जागा आहेत, तिथं स्मारक (Memorial) बांधले जावं असं ते म्हणाले. (Prakash Ambedkar Statement on Lata Mangeshkar Memorial on Shivaji Park)

लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं, अशी मागणी भाजपने (BJP) केली होती. त्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, "याला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहायला पाहिजे, त्याची स्मशानभूमी होऊ नये. शेजारी दुसरी चांगली मोठी स्मशानभूमी आहे. परंतु शिवाजी पार्क (Shivaji Park) हे एकमेव मोठं ग्राऊंड आहे. ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांच्या मॅचेस होतात. व्यक्तींचं स्मारक करायचे असेल तर इतर अनेक जागा आहेत, परंतु मुलांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानांवर अतिक्रमण करावं असे मला वाटत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT