Pravin Darekar on Vishwas Nangare Patil
Pravin Darekar on Vishwas Nangare Patil sakal media
महाराष्ट्र

विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर कारवाई करा;प्रविण दरेकरांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला याप्रकरणी विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप नेते प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) केली आहे. याचबरोबर संजय पांडे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. हल्ला झाला त्या दिवशी विश्वास नांगरे-पाटील घटनास्थळी दाखल झालेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होते. ते काल गृहमंत्री दिलीप- वळसे पाटलांच्या भेटीला गेले होते असेही ते म्हणाले. (Pravin Darekar on Vishwas Nangare Patil)

किरीट सोमय्या मुलगा नील सोमय्यासह फरार झाले आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपाला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रत्यूत्तर दिले. सोमय्यांनी पळून जाण्याचं काही कारण नाही. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. त्याचा निकाल येईपर्यंत कोणीही समोर येणार नाही. निकाल आल्यानंतर पोलिसांना ते सामोरे जातील असेही ते म्हणाले. साप म्हणून भुई थोपटणे हे संजय राऊतांचं काम आहे. त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. जंग-जंग पछाडून भाजपाच्या नेत्यांना अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राऊत यांना सूर सापडत नाही म्हणून शोध घेत असतात. सरकारचा वापर करून गुन्हे दाखल करायचे, अटक करायचे असे नियोजनबध्द ते करतात. मात्र भाजपातील सर्व नेते कायद्याला सहकार्य करतील.

जयंत पाटलांनी भाजप आणि मनसे याबद्दल आज वक्तव्य केले. यासंदर्भात दरेकर म्हणाले, राज ठाकरेंनी स्पष्ट हिंदूत्वाची भूमिका घेतली आहे. जयंत पाटलांनी आमची काळजी करू नये. त्यांनी मविआ सरकाकडे बघावं, त्यांनी निवडणुकांसाठी तयार राहावं असेही ते म्हणाले.

माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात मुंबई बॅंक बोगस मजूर प्रकरणी भाजप नेते प्रविण दरेकर यांची पुन्हा चौकशी होणार आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत त्यांनी सहकार्य करणार असल्याचे म्हटलं आहे. माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र चौकशीला सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. 'आप'ने केलेल्या आरोपावर ते म्हणाले, केलेल्या आरोपावर अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार आहे. मुंबई बॅंक मजूर घोटाळ्यातील बेछूट आरोपांप्रकरणी नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

Sharad Pawar : पंतप्रधान मोदी तुम्ही देशासाठी काय योगदान दिले?

KKR vs MI Live Score IPL 2024 : पावसामुळे नाणेफेकीस उशीर

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT