Praveen Darekar
Praveen Darekar sakal
महाराष्ट्र

निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांची आठवण आली; दरेकरांचा टोमणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकासआघाडी सरकारने कितीही शक्तिप्रदर्शन केल तरी काहीही होणार नाही. अपक्षांना आवश्यक निधी या सरकारने दिला नाही. त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सरकारने केले. निवडणूक जवळ आल्याने त्यांना अपक्ष आमदारांची (independence mla) आठवण आली आहे. त्यांच्यासोबत बैठक घेतली, असा टोमणा विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी लगावला. (pravin darekar Said Election reminded shiv sena of independence mla)

१० जूनला राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. आपले मत फुटू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेनेने (shiv sena) आपल्या आमदारांना दुसरीकडे पाठवले आहे. वर्षावर सर्व आमदार व अपक्ष आमदारांची बैठक बोलवली होती. मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महाविकास आघाडीने कितीही शक्तिप्रदर्शन केले तरी काहीही उपयोग होणार नाही, असे प्रवीण दरेकर (pravin darekar) म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला कधीही अपक्ष आमदारांची (independence mla) आठवण आली नाही. त्यांना आवश्यक असलेला निधी दिला नाही. उलट आपल्या पक्षातील नेत्यांना निधी देत त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले. मागच्या अडीच वर्षांत सरकारला अपक्षांची कधीही आठवण आली नाही. आता निवडणूक जवळ आल्याने त्यांची चिंता वाटू लागली आहे, असेही प्रवीण दरेकर (pravin darekar) म्हणाले.

अपक्ष आमदारांच्या मनात असंतोष

निवडणूक जवळ आल्याने अपक्ष आमदारांच्या भेटी घेतल्या जात आहे. कालच खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरात जाऊन अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. अपक्षांना कोणतेही सहकार्य केलेले नाही. यामुळे बैठका घेऊन काहीही उपयोग होणार नाही. त्यांना माहिती आहे मतदान कुणाला करायचे आहे. अपक्ष आमदारांच्या मनात असंतोष आहे, तो निवडणुकीत आपल्याला दिसून येईल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT