Pravin Darekar  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये, भाजपची पहिली प्रतिक्रिया

राणा दाम्पत्यांची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्येच जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सकाळापासून मुंबईत सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्याचा हाय व्होलटेज ड्राम्यानंतर अखेर कडक पोलीस बंदोबस्तात राणा दाम्पत्यांना बाहेर काढले असून, या दोघांनाही खार येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, या दोघांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (BJP Leaders Reaction On Navneet Rana)

या सर्व घडामोडींनंतर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात जुलमी राजवटीप्रमाणे मविआचं काम सुरू आहे. राणांवरील कारवाईचा निषेध करतो. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पोलिसांच्या मदतीने राज्यात गुंडाराज सुरू असून, कायदा सुव्यस्था कशी राखता येईल हे पाहण्याऐवजी सत्तेच्या माध्यमातून हा आतंकवाद पसरवण्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.

राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. (Navneet Rana Vs. Shivsena) त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी मातोश्रीसमोर पहारा दिला. नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. (Navneet Rana News)

दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे कारम देत राणा दाम्पत्याने आंदोलनातून माघार घेण्याचे जाहीर केले. मोदींचा उद्या मुंबईत दौरा असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा नको, यासाठी आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्धभवू शकतो. त्यामुळे आम्ही अमरावतीला माघारी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT