Sambhaji Brigade President Pravin Gaikwad addresses media after an alleged attack by Shivdharma Foundation members in Akkalkot.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Pravin Gaikwad reaction: ''मी याचा निषेध करणार नाही, परंतु एक निश्चित सांगतो की ज्यांनीपण हे घडवून आणलं, ही शेवटाची सुरुवात आहे.'' असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Sambhaji Brigade leader Pravin Gaikwad attacked in Akkalkot: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज(रविवारी) अक्कलकोट येथे शाई फेकण्यात आली, शिवाय त्यांचे कपडेही फाडून त्यांचा निषेध नोंदवला गेला. शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तर या खळबळजनक घटनेनंतर आता खुद्द प्रवीण गायकवाड हे मीडियासमोर आले आणि त्यांनी मोठा दावा केला आहे. शिवाय, या हल्ल्याला सरकारच जबाबदार असल्याचंही म्हणाले आहेत.

मीडियाशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, ''मी अक्कलकोटला गेलो होतो, अचानक शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं, त्यांनी माझ्यवार हल्ला केला, त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ही विचारधारा आहे, तुम्हाला आठवत असेल डॉ. पानसरेंचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला, डॉ. दाभोळकरांचा खून झाला, डॉ. गौरी लंकेशचा खून झाला.'' 

तसेच ''हा जो सत्ताकाळ आहे, यामध्ये पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत. कधीकधी पक्ष फोडले जातात, नंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यासारखी कुठलही गोष्ट करता नाही आली, की एक सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता, बंधुता, न्यात आणि स्वातंत्र्याचा आहे.'' असं गायकवाडांनी सांगितलं.

याचबरोबर ''या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. परंतु दुर्दैवाने सामाजिक संघटनांबद्दल काही गैरसम पसरवले जातात आणि मग हिंदुत्वावादी विचारसरणीच्या म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्यावर हल्ला केला.'' असं गायकवाड यांनी सांगितलं.

याशिवाय ''मी याचा निषेध करणार नाही, परंतु एक निश्चित सांगतो की ज्यांनीपण हे घडवून आणलं, ही शेवटाची सुरुवात आहे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे.'' असा इशाराही यावेळी गायकवाडांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi-Hindi controversy : मराठी शिकत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही; शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे मोठे विधान

ITI Courses: ‘आयटीआय’मध्ये सहा नवे अभ्यासक्रम; कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

सायना नेहवालचा घटस्फोट, इन्स्टा पोस्टमधून केलं जाहीर; १० वर्षे रिलेशनशिपनंतर लग्न, ७ वर्षांचा संसार

Satara News :'परतीच्या प्रवासात माउली फलटणमध्ये'; मुक्‍कामस्‍थळी आरतीसाठी गर्दी, पालखीसोबत दोन हजार वारकरी

Lonavala Accident: ट्रकमधील पाइप पडून दोन महिला ठार; पाच जखमी, बोरघाटात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील घटना

SCROLL FOR NEXT