Pregnency Tips esakal
महाराष्ट्र बातम्या

Pregnency Tips : अजब नियम! बाळंतपणात रडण्या-ओरडण्यावर आहे बंदी

बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म

सकाळ डिजिटल टीम

Pregnency Tips : असं म्हणतात की बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. बाळाला जन्म देत असताना म्हणजेच बाळंतपणाच्या वेळी कोणत्याही स्त्रीला असह्य वेदनांना सामोरं जावं लागतं. आता लोक तितक्या प्रवृत्ती असं जर म्हटलं तर जगभरात या बाळंतपणाच्या वेगवेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि समजुती आहेत.

काही ठिकाणी तर बाईला बाळंत होताना रडण्याची सुद्धा परवानगी नाहीये, तेच काही ठिकाणी बाईने त्रास सहन केलाच पाहिजे अशा प्रथा आहेत. अशा प्रथा परंपरा असण्यामागे नेमकी कारणं काय आहेत?

आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो, पण त्यात तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. लोक म्हणतात की, मुलाच्या जन्माबरोबर आईचा दुसरा जन्म होतो. कारण बाई या मृत्यूसारख्या असह्य वेदनांना हरवून पुन्हा जिवंत होत असते. या वेदनांनी ती व्हीवळत असते. पण या प्रसूती वेदनांबाबत अनेक देशांच्या वेगवेगळ्या आणि विचित्र समजुती आहेत.

दोन मुलांची आई असलेल्या मोफोलुवाके जोन्स प्रसूती वेदनांबाबत असलेल्या वेगवेगळ्या समजुती आणि परंपरांमधला अनुभव सांगतात. मोफोलुवाकेच्या पहिल्या मुलाचा जन्म नायजेरियात झाला, तिथं बाळंतपणाच्या वेदना शांतपणे सहन करण्याची प्रथा आहे.

तर दुसऱ्या मुलाचा जन्म कॅनडामध्ये 5 वर्षांनी झाला. तिथल्या तिच्या अनुभवाबद्दल ती सांगते की, "सर्व आरोग्य कर्मचारी अतिशय सभ्य होते. प्रत्येक गर्भाशयाच्या चाचणीपूर्वी ते माझी संमती घ्यायचे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा बाळंत व्हायचे विविध पर्याय त्यांनी मला सांगितले. प्रत्येक पर्यायाशी संबंधित धोके आणि फायदे समजावून सांगितले."

जोन्स सांगतात की, बाळंतपणाचा त्रास सहन करण्याची सक्ती नसावी. त्या वेदना कमी करता येतात. परंतु अनेक देशांमध्ये सांस्कृतिक गैरसमजामुळे प्रसूती वेदना गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. काही देशांमध्ये या काळात महिलांनी मोठ्याने ओरडावं अशी अपेक्षा असते. तर काही देशांमध्ये या वेदना शांतपणे सहन कराव्या लागतात.

उदाहरण म्हणून बघायचं झाल्यास ख्रिश्चन धर्मात, प्रसूती वेदना या स्त्रियांनी देवाची अवज्ञा केल्याबद्दल त्यांना दिलेल्या शिक्षेशी जोडल्या गेल्या आहेत. नायजेरियातील हौसा समुदायात बाळंतपणात रडण्यास मनाई आहे. त्यांना या वेदना मूकपणे सहन कराव्या लागतात.

नायजेरियातील फुलानी समुदायातील मुलींना लहानपणीच सांगितलं जातं की बाळंतपणाच्या वेळी घाबरणं किंवा रडणं लज्जास्पद असतं. बोनी समुदायातील मुलींना शिकवलं जातं की बाळंतपणाच्या वेळी स्त्रियांच्या वेदना त्यांची सहनशीलता दाखवून देतात. ओरडून त्यांच्या वेदना कमी होणार नाहीत, त्यामुळे त्या त्यांनी शांतपणे सहन कराव्या असं सांगितलं जातं.

ब्रिटिश गायनॅकोलोजीस्ट मेरी मॅकोले यांनी केलेल्या एका अभ्यासात असं म्हंटलय की, इथिओपियातील अर्ध्याहून अधिक मेडिकल प्रोफेशनल्सना पेनकिलर देऊन डिलिव्हरी करणं अवघड वाटतं, त्याचे बाळावर आणि आईवर परिणाम होतात असं त्यांना वाटतं. तेच दक्षिण-पूर्व नायजेरियातील एका संशोधनादरम्यान असं आढळून आलंय की, बहुतांश महिलांना बाळंतपणादरम्यान वेदना कमी करण्याबद्दल काहीच माहिती नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT