Sanjay Raut News | President Election News e sakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात - संजय राऊत

धनश्री ओतारी

देशात राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. असा खुलासा केला आहे.(Sanjay Raut News)

देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका संदर्भात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप नेते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. अशी माहिती दिली. (President Election News)

खासदार जास्त असल्याचा भाजपला फायदा आहे. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भाजप १०० मतांनी पुढे असेल. असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. फोनवरुन झालेल्या या संवादात राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. संविधान नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधीच पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. आकडेवारीचं गणित लावलं तर भाजप लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. त्याशिवाय अनेक राज्यात भाजपाचं सरकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT