(Prithviraj Chavan said, Candidate Mukul Wasnik from Nagpur (Prithviraj Chavan said, Candidate Mukul Wasnik from Nagpur
महाराष्ट्र बातम्या

मुकुल वासनिकांच्या उमेदवारीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दहा उमेदवारांची यादी रविवारी रात्री जाहीर केली. यात उत्तरप्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून संधी दिली आहे. महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे काँग्रेसने बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा यावेळीही कायम राखली आहे. तर नागपूरचे मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना राजस्थानातून संधी दिली आहे. वासनिक यांना नागपुरातून उमेदवारी देण्याचा सल्ला पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिला आहे. (Prithviraj Chavan said, Candidate Mukul Wasnik from Nagpur)

जेव्हाही बाहेरच्या व्यक्तीला संधी दिली जाते तेव्हा नाराजी व्यक्त केली जाते. हाच प्रकार यावेळीही घडला आहे. मुकुल वासनिक यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, त्यांनी नागपुरातून उमेदवारी घ्यावी. कारण, त्यांचा संपर्क नागपूर आणि विदर्भात कायम राहील. बदल केला पाहिजे असे माझे मत आहे. मात्र, हा केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

इमरान प्रतापगढी यांनी उत्तर प्रदेशातून तर मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज भरायला हवा. केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विचारपूर्वक ही उमेदवारी दिली असेल. परंतु, अजूनही वेळ आहे, असेही वासनिक म्हणाले. महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसला डावलले जात आहे, हे खरं आहे. मात्र, आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार नाही. खातं कुणाकडेही असले तरी निधी समान दिला पाहिजे. मात्र, असं होताना दिसत नाही. यामुळेच नाराजी वाढत आहे. याला वाचा फोडली पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

महाराष्ट्राला बाहेरचा उमेदवार

महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे काँग्रेसने (Congress) बाहेरचा उमेदवार देण्याची परंपरा यावेळीही कायम राखली आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार बनविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT