Pune Bypoll Election CM Eknath Shinde Mukta Tilak Laxman Jagtap Congress BJP NCP 73 candidates
Pune Bypoll Election CM Eknath Shinde Mukta Tilak Laxman Jagtap Congress BJP NCP 73 candidates  esakal
महाराष्ट्र

Pune Bypoll Election: CM शिंदेंच्या शब्दाला डावलून ७३ उमेदवार रिंगणात

सकाळ डिजिटल टीम

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्वपक्षीय नेत्यांना फोन करत आव्हान केले होते. मात्र, त्यांच्या मताला डावलत सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली उमेदवारी जाहीर केली. (Pune Bypoll Election CM Eknath Shinde Mukta Tilak Laxman Jagtap Congress BJP NCP 73 candidates )

कसबा आणि चिंचवडमध्ये तब्बल 73 उमेवार रिंगणात आहेत. त्यामुले संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे. यात भाजप महायुतीचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह 33 उमेदवारांनी दाखल केले असून या अर्जांची आज छाननी होणार आहे. तर चिंचवडच्या जागेसाठी 40 उमेदवार रिंगणार आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी

कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. टिळक कुटुंब निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असतानाही भाजपकडून टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली.

कसबा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक अटितटीची होणार असून, टिळक कुटुंबाच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत

चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेलेल्या जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे हे उमेदवार त्यांच्याविरुद्ध आहेत.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्यानं या मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT