Pune Bypoll Election mns Sandeep deshpande jab at sanjay raut over pm modi govt  ad  in saamana
Pune Bypoll Election mns Sandeep deshpande jab at sanjay raut over pm modi govt ad in saamana  Esakal
महाराष्ट्र

Pune Bypoll : "सरकारी जाहिरातीच्या पैशांवर…"; भाजपसोबत युतीवरून डिवचणाऱ्या राऊतांना मनसेचा टोला

सकाळ डिजिटल टीम

Pune Bypoll Election News : पुण्यातील पोटनिवडणूकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील आमदारांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणूकीत भाजप विरोधात महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान या निवडणूकीत मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर केलेल्या संजय राऊतांच्या टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसेचे नेचे संदीप देशपांडे यांनी सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जाहीरातीवरून टोला लगावला आहे. त्यांनी या जाहीरातीचा फोटो ट्वीट केला आहे. तसेच देशपांडे यांनी सरकारी जाहिरातीच्या पैशांवर चालणाऱ्या सामनामधून पगार घेणाऱ्यांची आमच्याबद्दल बोलायची लायकी नाही जाहिराती बंद तर पगार पण बंद "चड्डीत राहायचं ", असं ट्वीट केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या पोटनिवडणूकीत मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानंतर मनसेने भाजपला या पाठिंबा देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खोचक शब्दात टीका केली होती. संजय राऊत यांनी टेबला खालून जे व्हायचं ते आता टेबला वरून होतंय एवढंच असं म्हणत मनसे पहिल्यापासूनच भाजप सोबत असल्याचा दावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT