Ajit Pawar On Meteorological Department : हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यात न पाऊस पडतोय ना अंदाज बरोबर येतायेत अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवारांच्या या टीकेला उत्तर देताना होशाळीकर म्हणाले की, हवामान विभाग जे काही अंदाज वर्तवत असते त्यातील अंदाज बऱ्यापैकी बरोबर असतात. हवामान विभागाने दिलेल्या सूचना नीट वाचल्या जात नाहीत. हवामान विभागाने फक्त घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. तो बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. हवामान विभागाकडे बऱ्यापैकी यंत्रसामग्री असून, केंद्र सरकार पुरेपूर निधी वेळोवेळी हवामान विभागाला देत असते. पुढच्या 25 वर्षाचे नियोजन हवामान विभागाकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यात न पाऊस पडतोय ना अंदाज बरोबर येतायेत. मात्र, या अंदाजामुळे त्या त्या भागातील जिल्हाधिकारी शाळांना सुट्टी जाहीर करत आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर पुणे आणि पिंपरी परिसरातील शाळांना तीन दिवासांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पाऊस तर पडला नाही.
एकतर पहिलेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा व्यवस्थित भरल्या नाही. त्यात आता रेड अलर्टमुळे शाळांना सुट्ट्या देण्यात येत आहेत. मात्र, अंदाज चुकत आहेत. त्यामुळे अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने जो काही खर्च करायचा आहे तो करावा त्याला आमचा पाठिंबा असेल. यात फक्त अचूक अंदाज मिळाले पाहिजे हीच अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी परदेशातील हवामान खात्याच्या अंदाजाचे उदाहरणदेखील दिले. त्यांचे अंदाज खरे ठरतात मात्र, आपल्या हवामान खात्याने रेड अलर्ट दिला की पाऊस गायबच होतो. त्यामुळे अचूक अंदाजांसाठी काय करता येईल यावर ठोस उपाय योजना करण्यात याव्यात असे अजित पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.