Lockdown Sakal
महाराष्ट्र बातम्या

पुणे-मुंबईमध्ये निर्बंध लागू करण्यापूर्वीच रुग्ण घटले; ‘आयआयटी’चे संशोधन

मुंबई, पुणे आणि ठाणे या महानगरांमध्ये लॉकडाउन करण्यापूर्वीच कोरोनाबाधितांची संख्या स्थिर होऊन कमी होऊ लागली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मुंबई, (Mumbai) पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) या महानगरांमध्ये लॉकडाउन (Lockdown) करण्यापूर्वीच कोरोनाबाधितांची (Corona) संख्या स्थिर होऊन कमी होऊ लागली होती. पण, पुण्याच्या ग्रामीण भागात लॉकडाउननंतरही रुग्णांची (Patient) संख्या झपाट्याने वाढत होती, असा निष्कर्ष अभ्यासातून निघाला आहे. त्यामुळे भविष्यात साथनियंत्रणासाठी लॉकडाउन हा पर्याय नेमका कुठे आणि कधी वापरायचा याचा आता विचार करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट दिसते. (Pune Mumbai Number of Patients Decreased even before the Ban was Imposed)

महाराष्ट्रातील लॉकडाउन, आजारातून बरे झाल्यानंतर समाजात असलेल्या प्रतिकारशक्तीचे प्रमाण आणि संसर्गाचा प्रसार याचा अभ्यास मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (आयआयटी) प्रा. मिलिंद सोहनी आणि संशोधक निखिल टिकेकर यांनी ‘महाराष्ट्र : वेव्ह १, वेव्हे २ ॲण्ड फ्युचर’ या माध्यमातून केला आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला.

टिकेकर म्हणाले, ‘संसर्गाचे प्रमाण दोन मार्गांनी कमी होते. पहिला म्हणजे, लॉकडाउनमुळे लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे संसर्ग कमी होतो. दुसरा मार्ग, संसर्गाचे प्रमाण खूप वाढल्यानंतर तो कमी होण्यास सुरवात होते.’’

पुणे, ठाणे, मुंबई

लॉकडाउन पूर्वीच येथे कमी झाली रुग्णसंख्या

पुणे (ग्रा), सातारा, नगर

लॉकडाउनंतरही येथे वाढली रुग्णसंख्या

नाशिक, नागपूर

लॉकडाउनमुळे या भागातील रुग्णसंख्या झाली नियंत्रित

रुग्ण कुठे व का वाढले?

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या लॉकडाउनमध्येही वाढली. सातारा, नगर, सांगली आणि अनेक जिल्ह्यात हे चित्र कायम दिसते. पहिली लाट सात महिने सुरू होती. तर, दुसरी लाट सलग चार महिने होती. तुलनात्मक दृष्टीने बघता, पहिल्या लाटेत मुंबई सर्वाधिक त्यानंतर पुणे आणि नंतर नागपूरमध्ये रुग्ण होते. दुसऱ्या लाटेत सर्वांत कमी संसर्ग मुंबईत होता. त्यानंतर पुण्यात आणि नागपूरमध्ये त्यापेक्षा जास्त होता.

या वर्षी पुणे, मुंबई, ठाण्यामध्ये लॉकडाउन करण्यापूर्वीच रुग्णसंख्येचा उच्चांक होऊन ती संख्या कमी होण्यास सुरवात झाली होती. याचे कारण, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून इतक्या लोकांना संसर्ग झाला, की नवीन संसर्ग होणे अधिकाधिक कठीण होऊ लागले. लॉकडाउनचा परिणाम म्हणून संसर्गाचे प्रमाण वेगाने कमी झाले (संसर्ग कमी होण्याची गती वाढली) हे फक्त पुणे, मुंबई आणि ठाण्यात झाले. राज्याच्या इतर भागात संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते.

- निखिल टिकेकर, संशोधक

धारावीमध्ये गेल्या लाटेत साडेतीनशे मृत्यू होते, या लाटेत ते प्रमाण ४० पर्यंत कमी आले.

- प्रा. मिलिंद सोहनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT