Sharad Pawar And RadhaKrishna Vikhe Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर... : राधाकृष्ण विखे पाटील

महाविकास आघाडी नव्हे तर महाभ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

शिर्डी (जि.अहमदनगर) : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरील ईडीने केलेल्या कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडी नव्हे तर महाभ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. पुराव्यांशिवाय ईडीकडून कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरुन हे सिद्ध झाल्याचे विखे पाटील म्हणाले. (Radhakrishna Vikhe Patil Attacks On Sharad Pawar Over Politics)

२०१४ मध्ये मत मोजणी सुरु असताना राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना भाजप जातीवादी वाटले नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांना सोयीप्रमाणे भूमिका बदलताना जनतेने बघितले असून उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पवार यांना लगावला आहे. राज्यात लूट सुरु असून जनता त्याचे परिणाम भोगत आहे.

लोकांचा अधित अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. सर्व भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवावे. मुख्यमंत्र्यांनी आपला दर्जा टिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT