Rahul Shewale and Uddhav Thackeray News
Rahul Shewale and Uddhav Thackeray News Rahul Shewale and Uddhav Thackeray News
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी केली खासदार राहुल शेवाळेंशी चर्चा; पाठवले होते पत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तसेच इतर खासदारांना मुर्मू यांना मतदान करण्यास सांगावे, असेही म्हटले होते. यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. आता उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्याशी व्यक्तिशः चर्चा केल्याची माहिती आहे. (Rahul Shewale and Uddhav Thackeray News)

शिवसेना (Shiv sena) आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकारही कोसळले. दुसरीकडे शिवसेनेचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी करू शकतात, असेही वृत्त होते. अशात मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.

आता खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यासोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्तिशः चर्चा केली. मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाली. राज्यात महाविकास आघाडीसोबत शिवसेना असल्याने राहुल शेवाळे नाराज असल्याची चर्चा होती. आता राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्तिशः भूमिका मांडल्याची माहिती आहे. खासदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून सावधपूर्ण हालचाली सुरू आहेत.

१२ खासदार शिंदे गटासोबत?

बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी १२ खासदार लवकरच पक्ष बदलतील असा दावा केला होता. ५५ पैकी ४० आमदार आणि १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत. मी चार खासदारांना भेटलो आहे. २२ माजी आमदारही आमच्यासोबत आहेत, असे जळगावात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले होते. यामुळे हालचालींना वेग आल्याचे दिसते.

सोमवारी प्रमुख नेत्यांसोबत बैठक

सोमवारी १२.३० वाजता मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदार निलंबन प्रकरण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्व पक्ष बांधणी यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT