mantralya-mumbai
mantralya-mumbai 
महाराष्ट्र

बळीराजाला अवकाळीने झोडपले अन सरकारने सोडून दिले? 

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - पेऱ्याखाली असलेल्या 1 लाख 45 हजार जमिनीपैकी तब्बल 93 लाख हेक्‍टर जमिनीला पावसाने झोडपले ,नागपूर अधिवेशन या अस्मानी संकटावर फुंकर मारेल अशी अपेक्षा असताना पुरवणी मागण्यातील अत्यल्प तरतूद आता सुलतानी अनास्था दाखवते आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 23 हजार कोटींचे प्रावधान आवश्‍यक होते पण आज पुरवणी मागण्यात त्यासंबंधी कोणतीही तरतूद केलेली नाही. सात बाराचा उतारा कोरा करण्यासाठी 70 हजार कोटींची आवश्‍यकता असल्याने तेवढा निधी उभा करणे हे नव्या सरकार समोरचे आव्हान ठरणार आहे.

भाजपने नवे सरकार शेतकऱ्यांची अवहेलना करत असून पूर्वघोषणेनुसार निधी उपलब्ध करण्यासाठी काय पावले उचलणार या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.उदया शेतकरी विषयावरच सरकारला कोंडीत पकडण्याचे ठरवले आहे. आज सादर केलेल्या पुरवणी मागण्यात अवकाळी पावसाखालील जमिनीसाठी केवळ काही कोटींचे प्रावधान करण्यात आले आहे. काही तास टिकलेल्या फडणवीस सरकारने केलेले प्रावधान सोडून यावेळी पुरवणी मागण्यात कोणतेही प्रावधान करण्यात आलेले नाही.

राज्यातील पेरणीखाली येणाऱ्या 1.45 लक्ष लागवडीखाली येणाऱ्या जमिनीपैकी 93 लाखहेक्‍टर जमीनीवरील पिकाला अवकाळीचा फटका बसला आहे. यातील कोरडवाहू जमीनीवरील पिकाला हेक्‍टरी 25 हजार रूपयांची तर बागायतीला 50 हजारांची मदत करण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी केली होती. सध्या केलेले आर्थिक प्रावधान केवळ 750 कोटींचे असल्याने ते 92 लाख हेक्‍टर जमिनीसाठी वितरीत करण्याचा निर्णय घेतला तर अत्यंत तुटपुंजी मिळकत जमा होईल असेही लक्षात आणून दिले जाते आहे. केंद्र सरकार अवकाळी पावसातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत करणार असले तरी ती रक्‍कम अन्य राज्यांनाही दयावी लागणार असल्याने या तुन मिळणारा निधी अल्प रहाण्याची शक्‍यता आहे.यापूर्वी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी केंद्राने 5 हजार कोटींची मदत केली होती ,महाविकास आघाडीला केंद्र सरकार कितपत मदत करणार हा प्रश्‍न आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजाला पुन्हा एकदा अत्यंत कठीण दिवसांचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे. राज्यातले सरकार शेतकरीहितासाठी काम करणार आहे अशी भूमिका वारंवार स्पष्ट करण्यात आल्याने नागपूर अधिवेशनाकडे अपेक्षेने पाहिले जाते आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना दिलासादेण्यासाठी आता कोणते प्रयत्न होणार याकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे तर बळीराजाचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्रातील शेती अनेक आव्हानांना सामोरी जाते आहे,नापिकीचे वर्षे आणि त्यातच अवकाळीचे संकट यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.त्याला आर्थिक आधार दया अशी मागणी महाविकास आघाडीचे आमदार करणार आहेत. आक्रमक विरोधी पक्ष या विषयावर किती आक्रमक होणार यावरही सत्ताधारी आघाडी विचारकरते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT