महाराष्ट्र बातम्या

राज्यात आजपासून पावसाची शक्यता

राज्यात पूर्वमोसमीचा प्रभाव वाढणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अरबी समुद्राच्या (Arabian Sea) आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. त्यामुळे क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार असून, त्याचे चक्रीवादळामध्ये(Cyclone) रूपांतर होण्याचे संकेत आहे. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. (Rain forecast from today in state Cycle may occur in Arabian sea)

येत्या काही दिवसांत राज्यात पूर्वमोसमीच्या सरीचा प्रभाव वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यानंतर राज्याला अधिक फटका बसणार नसला तरी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत १५ मेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तसेच सुरुवातीला या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर राहून तो हळूहळू वाढत जाईल. साधारणपणे ताशी ८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायिकांनी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच अरबी समुद्र आणि दक्षद्वीप व मालदीव परिसर व हिंद महासागरातही वेगाने वाहणार असून, मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनला सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी असताना राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील तापमानात चढउतार होत आहे. भुयारी मेट्रोने मुठा नदी ओलांडली !

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस :

शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ

शनिवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ

रविवार ः संपूर्ण महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT