Rain-Environment esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पावसाचा अंदाज; पुण्यात तापमान घटले

सकाळ वृृत्तसेवा

पुणे : राज्यात रविवारपासून (ता. २५) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर येथे गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३७.७ अंश सेल्सिअस नोंदला.

मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, काही भागांत ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी सरी बरसत आहे. रविवारी (ता. २५) व सोमवारी (ता. २६) सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

राज्यात सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे कमाल तापमान कमी-जास्त होत आहे. मागील चार ते पाच दिवस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा पुन्हा काही अंशी कमी झाला आहे. सध्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. गुरुवारी सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमान कमीअधिक होत आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे सर्वांत कमी १९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

पुण्यात तापमान घटले

पुण्यात कमाल तापमानात गुरुवारी ०.५ अंश सेल्सिअसने घट होऊन ३७.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता. २३) आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारपासून (ता. २४) पुढील तीन दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT