Sakal-Exclusive 
महाराष्ट्र बातम्या

बापरे! राज्यात अतिवृष्टीने पहा यावर्षी किती घेतले बळी

प्रशांत बारसिंग

५०१ जखमी, ८२४ जनावरांनीही गमावले प्राण; पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान
मुंबई - राज्यात यंदा पावसाने कहर केल्याने अतिवृष्टी, आगी आणि अन्य अपघातांत ४५९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, ५०१ जण जखमी झाले आहेत. तसेच या नैसर्गिक आपत्तीमुळे ८२४ जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातून प्राप्त झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नुकसानीसंदर्भात आर्थिक मदत देण्यासाठी पुणे विभागाला ३८९ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे.

मॉन्सूनचे आगमन यंदा दोन आठवडे उशिराने झाले असले, तरी राज्यात पावसाने हाहाकार उडवला होता. कर्नाटकने त्यांच्या आलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडले नसल्याने त्याचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला होता. कोल्हापूर आणि सांगली शहरांसह दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी पाणी शिरले होते.

ते दोन आठवडे ओसरले नव्हते. सातारा जिल्ह्याच्या कऱ्हाड तालुक्‍यातही अशीच परिस्थिती होती. पुण्यात तर पहिल्यांदाच अतिवृष्टीमुळे अनेकांना प्राण गमावावे लागल्याची राज्याच्या इतिहासात पहिलीच घटना घडली होती. मुंबई-पुण्यातील इमारती आणि भिंतींच्या पडझडी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, अनेक ठिकाणी मोठ्या आगीही लागल्या होत्या. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते अपघात, वीज आणि झाडे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि आर्थिक हानीचा सामना करावा लागला होता. राज्याच्या इतिहासात इतक्‍या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच नुकसान झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या माहितीवरून दिसून येते.

अतिवृष्टीसाठी ३८९ कोटींची मदत
जुलैनंतर उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराने थैमान घातलेल्या भागातील ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतलेले नाही; पण त्यांच्या पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एक हेक्‍टरच्या मर्यादेत ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’मधून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या तिप्पट दराने भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुणे विभागासाठी ३८९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याच निधीतून मनुष्यहानी आणि मृत जनावरांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाटप करण्याचे आदेश सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आर्थिक मदत
मृतांच्या वारसांना - प्रत्येकी ५ लाख रुपये
मृत जनावरांसाठी - प्रत्येकी ३० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune Drunk Drive Accident: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT