Raj Thackeray Sabha e sakal
महाराष्ट्र बातम्या

आता महाराष्ट्रातून भाजपचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवे.

सकाळ डिजिटल टीम

राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या उत्तर प्रदेशातील दौऱ्याला तेथील एका खासदाराने विरोध केला. त्यानंतर आता मुंबई भाजपमधूनही त्यांच्या दौऱ्याला विरोध होत आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरे यांनी फेरीवाले, टॅक्सीवाले तसेच मजूर या सर्व कष्टकरी वर्गाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, आता मुंबईतील भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीच राज यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. संजय ठाकूर यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांनाही यासंदर्भात एक निवेदन दिले. उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जी काही मारहाण झाली, त्याविषयी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त करायलाच हवा. भविष्यात भाजपसोबत युती करण्याआधी हे व्हायला पाहिजे आणि त्यासाठी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राज यांच्यावर दबाव आणायला हवा,' असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

'मी घटनात्मक पद्धतीने विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची गरज नाही, मात्र आम्ही राज यांच्यावर निश्चित दबाव आणू शकतो. राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवे. त्यामुळे तुमचे हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचे स्पष्ट होईल,' असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरून सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. उत्तर भारतीयांना राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेमुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतरच त्यांना अयोध्येत पाऊल टाकायला देऊ, अशी भूमिका उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छेद दिला. कोणी रामाच्या दर्शनाला जात असेल, तर त्याला जाऊ द्यावे, असे सांगत त्यांनी राज यांची पाठराखण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT