mns important meeting at raj thackeray residence shivatirtha over loudspeakers row  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; राज्य पेटवण्याचा मनसेचा इशारा

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आली असून या पत्रात उर्दू शब्द वापरण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने घेतलेली भूमिका सध्या राज्यात चांगलाच वादाचा विषय ठरला आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी अनेक मनसैनिकांची धरपकड केली आहे. या सगळ्या गोंधळातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray)आणि नेते बाळा नांदगावकर(Bala Nandgaokar) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमक्या देणारं पत्रही आपल्याकडे आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

या प्रकरणात नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. काल नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे(Police Commissioner Sanjay Pandey) यांचीही भेट घेतली, तसंच त्यांना या पत्राची प्रतही दिली. याबद्दल नांदगावकर म्हणाले, मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्राची प्रत मी काल पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली आहे. गृहमंत्र्यांशीही (Home Minister Dilip Walse Patil) बोलणं झालं आहे. हे पत्र कोणाकडून आलंय याबद्दल माहिती नाही. नांदगावकरला धमकी दिली तर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य , केंद्र सरकरानेही घ्यावी.

धमकीचं हे पत्र हिंदीतून लिहिलेलं आहे. या पत्रात काही उर्दू शब्दही वापरण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आपण गृहमंत्र्यांशी बोललो आहे. ते चांगले गृहमंत्री आहे, ते नक्कीच कारवाई करतील, असंही नांदगावकर म्हणाले आहे. राज्य तसंच केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश्वरी मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT