Raj Thackeray Birthday Jitendra Awhad take a jibe at MNS Chief over Future Maharashtra cm Poster  
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Birthday : "सध्यातरी एकच आमदार, नकला करून, शेपटीला धरून…"; राज ठाकरेंना शुभेच्छा देताना आव्हाडांचा टोमणा

रोहित कणसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमीत्त राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थ या निवसस्थानी दाखल होत आहेत. सर्व स्तरातून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी यांनी देखील राज ठाकरेंना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

आव्हाड काय म्हणाले…

राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे पोस्टर लागले आहेत. ते व्हावेत अशी मनापासून शुभेच्छा. सध्यातरी एकच आमदार आहे, अजून जवळपास पन्नास-साठ तरी वाढवावे लागतील. यासाठी त्यांनी कृतीशील कार्य करावं याच शुभेच्छा.

नुसतेच टोमणे, नकला असं न करता महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप काय आहे ते जर महाराष्ट्राला कळलं तर बरं होईल. याचा आवाज काढून, याला मी शेपटीला धरून आपटीन, त्याला मी हाताला धरून फिरवीन असे प्रकार कमी करावेत.. असे आव्हाड म्हणाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कालपासून राज्यभरातील मनसैनिक शिवतीर्थाव गर्दी करत आहेत. राज ठाकरे यांनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.

राज ठाकरे यांच्या ५५व्या वाढदिवसनिमीत्ताने त्यांचे कार्यकर्ते पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोषही करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

SCROLL FOR NEXT