Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "मनसेच्या वाटेला लागलं की मुख्यमंत्री पद जातं" ; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला. 

"पाकिस्तानी कलाकारांना आपण ४८ तासात हुसकावून लावलं आणि सो कॉल्ड जे स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात ते यावेळी कुठे होते. ते चिंतन करत होते. मशिदींवरील भोंगे असुदे पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून लावणे असूदे, हे सर्व आंदोलने मनसेने केली. याबद्दल ते (उद्धव ठाकरे) सांगतात आम्ही हिंदुत्व मानतो. हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही," असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, "मशिदींवरील भोग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलावले. मला विरोध करणारे हिंदुत्ववादीचं होते. मला त्यावेळी आतल राजकारण कळलं होत. म्हणून मी त्यावेळी शांत राहलो. ज्यांनी हे केलं त्यांचे पुढं काय झालं. सत्ता गेली. त्यामुळे आपल्या वाट्याला कुणी जायचं नाही. भोग्यांचे आंदोलने झाली तेव्हा १७ हजार मनसे सैनिकांवरती महाराष्ट्रभर केसेस टाकण्यात आल्या. पुढे त्यांना मुख्यमंत्री पदावरुन जाव लागल. यावर २२ मार्चला बोलेल."

भाजपला देखील लगावला टोला - 

भाजपबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची भरती सुरुय. आहोटी येणार. भरती-ओहोटी येतच असते. राजू पाटील हे एकटे आपल्या पक्षाची बाजू मांडत आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

आजपर्यंत आपण एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. तरीही काही लोक टीका करतात. भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करु..पण एकही पत्रकार त्यांना विचारत नाही. आम्ही काय केलं, हे जनतेला माहिती आहे.

या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या कामाबद्दलच्या एका पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. मनसेने केलेल्या कामाची माहिती या पुस्तकामध्ये आहे. मनसेने नाशिमध्ये केलेल्या कामाचा पाढाच राज यांनी वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : आंतरराज्य घरफोडी, चोरी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून अटक

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT