राज ठाकरे Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हा मुद्दा देशभरात गाजला, महाराष्ट्रात देखील यावरून चांगलेचे राजकीय वातावरण तापले. या दरम्यान राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. दरम्यान आता राज ठाकरे यांनी ट्विट करत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना या दौऱ्याविषयी माध्यमांशी बोलण्याबाबत काही सूचना केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी त्यांच्या आयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणी प्रसार माध्यमांशी बोलू नये, पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत ते याबाबत बोलतील, इतरांनी याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये असे म्हटले आहे. इतकेच नाही तर इतर विषयांवर पदाधिकारी किंवा कोणीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे, असे सांगण्यात आले आहे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घावे असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. मात्र त्याआधी उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल आणि त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी असे विधान भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brujbhushan Singh) यांनी केले होते. तसेच माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर या इशाऱ्याला मनसेकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाजीराव पेशवेंच्या सासरकडील मंडळींचा अवमान; मस्तानीच्या वंशजांचा अमित शहांसोबतच्या कार्यक्रमावर बहिष्कार

Stock Market: शेअरने 24 तासांत बनवले करोडपती; आता केलं कंगाल, एवढी मोठी घसरण कशी झाली?

Mira-Bhayandar: गुजराती व्यावसायिकाला मारहाण! मनसेच्या विरोधात आज मीरा भाईंदर बंद, काय आहे प्रकरण?

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

ENG vs IND: टीम इंडियाला पुजाराचा वारसदार मिळेना! ७ सामन्यात 'या' ५ खेळाडूंनी लावली तिसऱ्या नंबरवर हजेरी

SCROLL FOR NEXT