Raj Thackeray on Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray News: "पक्ष वयात आला तरी यांचं..."; कालच्या सभेनंतर संजय राऊतांचा टोला

Raj Thackeray News: उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटते, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray Speech News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर काल बोलले, त्यावरुन संजय राऊतांनी सुनावलं आहे. (Sanjay Raut Reaction on Raj Thackeray speech)

संजय राऊत (Sanjay Raut) आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "मी त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण सकाळी वाचलं. पक्षाला १८ एक वर्ष होऊन गेली, पक्ष वयात आला तरी त्यांच्या पक्षाचं काय चाललंय मला माहित नाही.

अठरा वर्षानंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्यावर बोलतात. नारायण राणे इतक्या वर्षांनंतर उद्धव ठाकरेंवर बोलतात, भाजपा, राज ठाकरे सगळेच उद्धव ठाकरेंवर बोलतात. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सगळ्यांना भीती वाटते.

राज ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, "तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रश्न उफाळून वर आलेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. तो अमृतपाल पंजाबमधून महाराष्ट्रात घुसलाय. त्यावर कोणी बोलत नाही. (Marathi Tajya Batmya)

पण तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच. त्यामुळे उद्धव ठाकरेंची धास्ती आणि वय किती हे स्पष्ट होतं. वीस वर्षे झाली आता विसरा. तुम्ही, तुमचा पक्ष कुठे आहे ते बघा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT