महाराष्ट्र

राज ठाकरेंनी मोदींवरील टीकांचं उत्तर द्यावं, मग युतीचं बघू; भाजपच्या बड्या नेत्याचा आक्रमक पवित्रा

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्तासंघर्षानंतर आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष एकत्रित येत युती करत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्रित येणार असल्याच्या चर्चा बऱ्याचदा सुरू असतात. अशातच काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले होते. अशातच आता या टीकेवरून युतीमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.

दरम्यान एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांपासून भेटीगाठी सुरू आहेत. अशातच मनसे आणि भाजपची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नसलं तरी पण मनसे-भाजप युतीला कोणीही विरोध केलेला दिसून येत नाही. आता पहिल्यांदाच भाजपमधून या युतीला विरोध करण्यात आल्याचं दिसून येत आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी या युतीची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोट ठेवत युतीला विरोध दर्शवला आहे. भाजप आणि मनसे युतीची आम्हाला गरज नाही. पक्षाने जर तसा निर्णय घेतला तर माझा या युतीला विरोध असणार आहे, असंही संजय काकडे म्हणलेत. ज्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यांच्यासोबत जाऊच कसे शकतो? अशा लोकांबरोबर जाण्याची गरज नाही. मोदींवरील टीकेबाबत राज ठाकरे यांनी आधी उत्तर द्यावे, मगच पुढे बोलू, असंही काकडे म्हणाले आहेत.

संजय काकडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मनसे ही शिवसेनेची बी टीम असल्याचं म्हटलं आहे. गरज पडली तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. शिवसेना आमचा पारंपारिक मित्रं आहे. शिवसेनेसोबत जाणं कधीही योग्यच आहे, असं मोठं विधानही त्यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT