MNS chief Raj Thackeray on Comment on NCP leadership

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Tweet on NCP President Post : ‘’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण..’’ ; राज ठाकरेंच्या ट्वीटने खळबळ

Raj Thackeray tweet on NCP leadership : सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ट्वीट समोर आले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Mayur Ratnaparkhe

Raj Thackeray Tweet Triggers Political Debate in Maharashtra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. यामुळे सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला. यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत अन् त्यांची जागा कोण घेणार याबाबत विविध चर्चा सुरू होत्या, मात्र त्यामध्येही अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचेच नाव स्वाभाविकपणे अग्रस्थानी होते. अखेर झालेही तसेच, आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

याशिवाय आता सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा असणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घडामोडीआधी ही देखील बातमी जोरदार चर्चेत होती आणि काही नेत्यांकडूनही यास दुजोरा दिला गेला होता की, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार होते, एवढंच नाहीतर त्यादृष्टीने अजित पवार आणि शरद पवारांची बैठकही झाली होती. मात्र तत्पुर्वीच अजितदादांचे अपघाती निधन झाले आणि या प्रक्रियेला ब्रेक लागल्याचे दिसत आहे.

परंतु अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत की, या विलिनीकरणास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा विरोध आहे. त्यामुळेच एवढ्या तातडीने सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी करून घेतला आणि त्यांच्याकडे पक्षाध्यक्ष पदही सोपवलं जात आहे.  या दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत एक ट्वीट केलं आहे, ज्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? -

दरम्यान यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे मोठं विधान केल्याचे समोर आल आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘’महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला,  आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही.’’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे आहे याचा यामधून सर्वांनाच अंदाज येतो. त्यामुळे आता खरोखरच अजितदादांच्या पश्चात सुरू झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांच्याही मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Ajit Pawar: अर्थखातं मुख्यमंत्री फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवारांकडे 'या' खात्यांची जबाबदारी

IND vs NZ, 5th T20I: काळजी करू नका संजू सॅमसन..., टॉस जिंकल्यावर सूर्यकुमारने जाहीर केले प्लेइंग इलेव्हनमधील मोठे बदल

Union Budget: फिस्कल डेफिसिट, राजकोषीय धोरण अन्... केंद्रीय अर्थसंकल्पातील कठीण आर्थिक शब्दांचे सोपे अर्थ बजेट आधीच समजून घ्या...

VVMC: तब्बल १० वर्षांनंतर दिसणार विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा, 'या' प्रतिनिधींची नावे चर्चेत; वसई-विरार महापालिकेत काय घडणार?

Education News : समीर भुजबळांच्या हस्तक्षेपानंतर संपूर्ण जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; ३ दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT