Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

जलसंपदा मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध होणार?

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर ( सांगली) : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ (Rajarambapu Patil Sahakari Dudh Sangh) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रंजना बारहाते (Ranjana Barhate)या काम पाहत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १३ डिसेंबर) हा अंतिम दिवस आहे. दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष विनायकराव पाटील यांचा आज एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली या संघाची निवडणूक बिनविरोध होईल, अशीच शक्यता जादा आहे. ( Rajarambapu Dudh Sangh in Islampur)

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १३ डिसेंबर) अंतिम दिवस आहे. त्यानंतर १४ तारखेला छाननी, तर १५ डिसेंबरला अर्ज माघारीचा दिवस आहे. निवडणुकीसाठी ३० तारखेला चिन्ह वाटप, गरज पडल्यास ८ जानेवारीला सकाळी ते ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान, व त्यानंतर मतमोजणी व त्याच दिवशी निकाल घोषित होईल. एकूण १२५ संस्था सभासद संख्या असलेल्या या निवडणुकीत फक्त ९५ ठराव निवडणुकीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे ९५ मतदारच निवडणुकीचा हक्क बजावतील.

इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून निवड प्रमुख म्हणून राजारामबापू बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांची कमिटी नेमली आहे. ही कमिटी उमेदवारांची निवड करून त्यांना अर्ज दाखल करायाला सांगतील. सध्याच्या संचालक मंडळातील बहुतांशी संचालकांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, तर काही नवीन चेहरेही दूध संघ संचालक मंडळात दिसतील .एकूणच १९ संचालक असलेली दूध संघाची निवडणूक बिनविरोध होईल, असे सध्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT