Maharashtra Kesari Competition: महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगीर आणि कुस्तीप्रेमींसाठी एक उत्सवच असतो. दोन वर्ष कोरोनामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. परंतु यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार हे निश्चित झाले. सध्या साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडीयम येथे सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मल्ल आपलं महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत आहेत. आपल्या उत्कृष्ट डावांनी कुस्तीप्रेमींचं लक्ष वेधणाऱ्या तगड्या पैलवानांप्रमाणेच एका अवलियानं तमाम कुस्तीप्रेमींच लक्ष वेधलं आहे. हा अवलिया म्हणजे प्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे. (Raju Awale, playing Halagi in the wrestling competition for 42 years)
राजू आवळे गेल्या 42 वर्षांपासून कुस्ती स्पर्धांमध्ये हलगी वाजवतात. कुस्ती आणि राजू आवळेंची हलगी हे आता समीकरणच बनलं आहे. तब्बल चार हजारांपेक्षा जास्त कुस्ती आखाड्यांमध्ये त्यांनी हलगी वाजवली आहे. यामध्ये 10 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि 11कर्नाटक केसरी स्पर्धांचा समावेश आहे. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर येथील राजू आवळे यांच्या अनेक पिढ्यांनी हलगी वादन केले आहे. हाच वारसा आणि वादनाचे तंत्र पाझरत राजू आवळेंच्या रक्तात उतरले आहे. विशेष म्हणजे राजू आवळे यांनी पाच वर्ष नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु हलगीलाच त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे.
हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांनी आपल्या पाठीवर टाकलेली कौतुकाची कौतुकाची थाप हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे राजू आवळे सांगतात. लाल माती आणि बजरंगबलीची कृपा तसेच लोकांचे आशिर्वाद हेच आपल्या ऊर्जेचं रहस्य आहे असंही ते सांगतात. आपल्या हलगीवादनानं कुस्ती आखाड्यातील उत्साह द्विगुणीत करणाऱ्या राजू आवळेंवर म्हणूनच सारे कुस्तीप्रेमी आदर करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.