महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?'

या कायद्याला विरोध असूनही महाविकास आघाडीने यावर संशोधन करुन तो अमंलात आणला

सकाळ डिजिटल टीम

या कायद्याला विरोध असूनही महाविकास आघाडीने यावर संशोधन करुन तो अमंलात आणला

कोल्हापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्याच्या बजेटमध्ये 50 हजार रुपये अनुदानाची घोषणा केली नाही, तर बारामतीला (Baramati) आल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा दिला. साखर कारखान्यांनी गळीतासाठी तोडलेल्या उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये 15 मार्चच्या आत त्वरित द्यावा, अन्यथा कणभरही साखर गोडावून बाहेर जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर आणि राज्यातील कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) विनंती केली आहे.

यात ते म्हणतात, भूमी अधिग्रहण कायदा (Land Acquisition Act) काँग्रेसनं २०१३ ला आणला तो बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला. तेव्हा त्याविरोधात काँग्रेसनं (Congress) भूमिका घेत शेतकऱ्यांची बाजू घेतली. पण आता महाविकास आघाडी सरकार त्याविरोधात काम करत आहे. याला विरोध असूनही महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) हा कायद्यावर संशोधन करुन तो अमंलात आणला आहे. यावरून अस दिसतंय की एकतर कॉंग्रेसची निती बलदलली आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल त्यांनी राहुल गांधी यांना केला आहे.

दरम्यान, आता त्यांच्या या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटणार का अशी चर्चा सुरु आहे. यामुळे राज्यातील कॉंग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील नेते यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे राहुल गांधी यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

Latest Marathi News Live Update : सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात

Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!

Pune News : महापालिकेने केली इमारत पाडकामासाठी नियमावली

SCROLL FOR NEXT