political google
महाराष्ट्र बातम्या

संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब

थोड्याच वेळात या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

थोड्याच वेळात या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. सहाव्या जागेसाठी आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असून संभाजीराजे छत्रपतींना सेनेने उमेदवारीसाठी पक्ष प्रवेशाची अट घातली होती. मात्र आता संभाजीराजेंचा पत्ता कट करुन शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार फायनल करण्यात आला आहे. शिवसेनेने कोल्हापुरातले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे. थोड्याच वेळात या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या ऑफरकडे संभाजीराजेंनी पाठ फिरवली होती. पण आता कोल्हापुरातल्या शिवसेना नेत्याचा विचार केला जात असल्याने संभाजीराजेंनी लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात होते. यातच संभाजीराजेंनी उमेदवारी फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना नेत्यांनाच उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. शिवेसनेन संभाजीराजेंना निर्णय घेण्यासाठी वेळ दिला होता. आता शिवसेनेनं संभाजीराजे यांचा पत्ता थेट करुन कोल्हापुरातील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यसभेसाठी शिवसेना कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यात संजय पवार यांच्या नावाचीही चर्चा होती. दरम्यान, माझ्या नावाची चर्चा असल्याचं मला माध्यमांकडूनच कळालं. या यादीमध्ये आढळराव पाटील, उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण मला संधी मिळाली तर नक्की चांगलं काम करून दाखवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुण्यात बोलताना दिली आहे. राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा आहे. हे मला माध्यमांतूनच समजलं. पण याबाबत अद्याप वरिष्ठ नेत्यांकडून काहीही सिग्नल नाही. कोणाचाही फोन आलेला नाही, असंही संजय पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT