महाराष्ट्र बातम्या

...म्हणून राणा अन् मुनगंटीवारांचे मत बाद करा; शिवसेनेची मागणी

राज्यासभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडले असून, आता विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यासभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडले असून, आता विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पाच वाजता पार पडलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. परंतु, भाजपने (BJP) मविआच्या तीन जणांनी मतदान प्रक्रियेत नियमांचा भंग केल्याचा आरोप करत आयोगाकडं तक्रार केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेनंदेखील (Shivsena) अपक्ष आमदार नवनीत राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांचे मत बाद करावे, असे म्हणत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. (Maharashtra Rajyasabha Election Update News)

शिवसेनेकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, यामध्ये मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवर यांनी निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचे तर, रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केल्याचे शिवसेनेनं तक्रारीत म्हटले आहे. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणे म्हणजे नियमांचे भंग असल्याचे शिवसेनेनं तक्रारीत म्हटले आहे.

ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरु : राऊत

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडलं. पण दीड तास उशीर झाला तरी अद्याप मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून "ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरु" अशा शब्दांत भाजपवर टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT