sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

"ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरु"; राज्यसभा मतमोजणी लांबल्यानं राऊतांचं ट्विट

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी मतदान पार पडलं पण अद्याप मतमोजणी सुरु होऊ शकलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडलं. पण दीड तास उशीर झाला तरी अद्याप मतमोजणीला सुरुवात होऊ शकलेली नाही. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून "ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरु" अशा शब्दांत भाजपवर टीका केली आहे. तसेच काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलेलं ट्विट शेअर करत राऊत यांनी महाराष्ट्रातही अशा प्रकारचं "घाणेरडं राजकारण" सुरु असल्याचं म्हटलं आहे. (Rajya Sabha elections Bad politics Sanjay Raut tweet after counting of votes was delayed)राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडी चा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!

राऊत यांनी ट्विट करत म्हटलं, "राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!" तसेच अजय माकन यांचं ट्विट शेअर करत राऊत यांनी लिहिलंय, "महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. सध्या राज्यात घाणेरडं राजकारण सुरु आहे"

अजय माकन यांनी ट्विट केलं की, राज्यसभा निवडणुकीच्या निकालात नामुष्की ओढवणार असल्याच्या भीतीनं-भाजपनं हरियाणात मतमोजणी थांबवून घाणेरडं राजकारण केलं आहे. भाजपचे आक्षेप फेटाळत रिटर्निंग ऑफिसरच्या निर्णयावर एक नजर टाका, असं म्हणत माकन यांनी रिटर्निंग ऑफिसरचं एक पत्र शेअर केलं आहे. तसेच भारतात लोकशाही अजूनही जिवंत आहे का? असा सवालही विचारला आहे.

दरम्यान, मतपत्रिका इतरांना दाखवल्याचा आरोप करत भाजपनं जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे, यशोमती ठाकूर यांची मत बाद करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण ही तक्रार फेटाळून लावण्यात आली त्यानंतर भाजपनं थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यावर आयोगानं मतदानाचा व्हिडिओ मागवून तो तपासून नंतर निर्णय देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं अद्याप मतमोजणी सुरु झालेली नाही.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार आणि भाजपचे अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे उमेदवार रिंगणात आहेत. यांपैकी संजय पवार आणि धनंजय महाडिक हे सहाव्या क्रमांकाचे उमेदवार आहेत. या दोन उमेदवारांमध्येच प्रामुख्याने लढत होत आहे. या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात असल्यानं त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT