Devendra Fadnavis said, At least show the government running
Devendra Fadnavis said, At least show the government running Devendra Fadnavis said, At least show the government running
महाराष्ट्र

Rajyasabha Election Result: आमच्या विजयाने ते बावचळलेत - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आम्ही आमचा पराभव मान्य करतो. काय बरोबर आणि काय चुकले याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही संख्यांवर नजर टाकली तर स्पष्टपणे आमच्याकडे शेवटपर्यंत योग्य संख्या नव्हती. पण आम्ही एक संधी घेतली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

राऊत काय ब्रह्मदेव आहेत का?; 'गद्दारी'च्या आरोपानंतर देवेंद्र भुयार भडकले

संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे आता ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत, असं वाटू लागलंय. मतदान गोपनीय असतं, मी मत दिलं नाही, हे यांना कसं माहित? मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे, पण माझी वैयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरून माझी नाराजी नाही. माझी मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी मी उघडपणे व्यक्त केली. उद्धव ठाकरेंसमोर नाराजी मांडायची नाही तर काय दाऊदसमोर मांडायची का?, अशी संतप्त प्रतिक्रिया अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे. संजय राऊतांनी त्यांच्यावर शिवसेनेला मतदान न केल्याचा आणि गद्दारी केल्याचा आरोप केला आहे.

राऊतांनी सांगितली 'गद्दारां'ची नावं

संजय राऊतांनी 'गद्दार' आमदारांची यादीच जाहीर केली आहे. संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे यांनी आपल्याला मतदान केलं नाही, त्याचबरोबर हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीनेही आपल्याला मतदान केलं नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र भुयारांनी राऊतांचे हे आरोप फेटाळले आहेत.

'ज्यांनी गद्दारी केली, त्यांची यादी आमच्याकडे... पाहून घेऊ!'

"राज्यसभा निवडणुकांत आमचा पराभव झाला पण भाजपचा मोठा विजय झाला नाही. आम्ही व्यवहारात पडलो नाही आणि आम्ही व्यापारही केला नाही तरी आम्हाला पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली आहेत. ज्या कुणी गद्दारी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नाव आमच्याकडे आहेत पण ठीके पाहून घेऊ." असा इशारा राऊतांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक

भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीतल्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या कौतुकाला उत्तर देतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट केलं आहे. चंद्रकांत पाटील ट्विटमध्ये म्हणतात," 'माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला' ही शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. आमचे देवेंद्र फडणवीसजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे".

"फडणवीसांना लोकांना आपलंसं करण्यात यश आलं"

संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना लोकांना आपलेसं करण्यात यश आलं. मात्र, अपक्षांच्या मतांमध्ये गंमती झालेल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीला मिळालेलं ज्यादाचं मत 'मविआ'चं नाही, शरद पवारांनी उघडले पत्ते

संपूर्ण निकाल लागल्यानंतर मविआची 10 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. आणि धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांना लोकांना आपलेसं करण्यात यश आलं. मात्र, अपक्षांच्या मतांमध्ये गंमती झालेल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पटेल यांचा मतांचा कोटा पूर्ण झाल्याने त्यांचा राज्यसभेचा रस्ता सुकर झाला आहे. मात्र, शिवसेनेचा सहावा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर आहे. यावर बोलताना पवारांनी पटेल यांना एक ज्यादाचं मत मिळाल्याचं सांगितलं. हे मत मविआतील नसून अन्य बाजूचं असल्याचं पवारांनी सांगितलं, आणि आता चर्चा वाढू लागल्या आहेत.

कालच्या निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, या धक्क्यानंतर मविआचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. दिलीप वळसे पाटलांसह काही प्रमुख नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत.

भाजपाच्या विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

"कोणाचा पराभव झाला? पहिल्या पसंतीची सर्वाधिक मत संजय पवार यांना पडली. पण मोठा विजय झाला, हे चित्र उभं केलं जातंय. काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाहीत, ते आम्हाला माहीत आहे. पण राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया किचकट असते. ज्यांना विजय मिळाला त्यांचं अभिनंदन".

"आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांची व्यूहरचना उत्तम होती. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं. निवडणूक आयोगाने त्यांनाच प्राधान्य दिलं", असं मत पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

...त्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं - धनंजय महाडिक

"भाजपाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांच्या कष्टामुळे, यांच्या रणनितीमुळे भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आले. कोणतीही निवडणूक असली की टेन्शन हे असतंच. ज्या दिवशी अर्ज भरला, तेव्हाच सांगितलं होतं की भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, कारण फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसतं", अशीा भावना धनंजय महाडिक यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे..

"निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती"

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या संजय पवारांशी अटीतटीची लढत देत भाजपाचे धनंजय महाडिक निवडून आले आहेत. भाजपाच्या तिन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, "निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती. जय महाराष्ट्र!"

राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यामध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे एक, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी उमेदवाराने विजय मिळवला. सहा जागांसाठी सात उमेदवार उभे राहिले होते. भाजपाचे पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिघेही निवडून आले असून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हेही निवडून आले आहे. शिवसेनेला मात्र धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले असून संजय राऊतांना अगदी निसटता विजय मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT